येत्या काही दिवसांत भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. बुधवारी (८ डिसेंबर) या दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे, तर आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विराट कोहली याला कर्णधार पदावरून काढून वनडे संघाचे कर्णधारपद आता रोहित शर्मा याला देण्यात आले आहे. यापूर्वी विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान आता रोहित शर्माने विराट कोहली बाबत मोठे वक्तव्य केले आहे.
आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर कर्णधारपद रोहित शर्माला देण्यात आले होते. तसेच आता विराट कोहलीला वनडे कर्णधार पदावरून देखील काढून वनडे संघाचे कर्णधारपद देखील रोहित शर्माला देण्यात आले आहे.
याबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ” विराट कोहलीसारख्या फलंदाजाची नेहमीच संघात आवश्यकता असते. त्याची टी२० क्रिकेटमधील सरासरी ५० पेक्षा अधिक आहे. हे खरच कौतुकास्पद आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याने अनेकदा फलंदाजी करून संघाला सामना जिंकून दिला आहे. विराट कोहली ज्याप्रकारे फलंदाजी करतो, त्याची संघाला गरज आहे. तो अजूनही या संघाचा लीडर आहे. तुम्ही त्याला सोडू शकत नाही. त्याची उपस्थिती संघासाठी अतिशय महत्वाची आहे.”
The All-India Senior Selection Committee also decided to name Mr Rohit Sharma as the Captain of the ODI & T20I teams going forward.#TeamIndia | @ImRo45 pic.twitter.com/hcg92sPtCa
— BCCI (@BCCI) December 8, 2021
विराट कोहलीची वनडे संघाचा कर्णधार म्हणून कारकीर्द
त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९ पैकी १५ मालिकांमध्ये विजय मिळवला होता. यापैकी मायदेशात त्याने ९ पैकी ८ मालिका आपल्या नावावर केल्या. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन २-१ वनडे मालिकेत विजय मिळवला. तर दक्षिण आफ्रिकेत ५-१ ,वेस्ट इंडीजमध्ये ३-१ ने विजय मिळवला. तसेच न्यूझीलंड,श्रीलंका,झिम्बाब्वे आणि बांगलादेशमध्ये जाऊन देखील विराट कोहलीने भारतीय संघाला विजय मिळवून दिले.
महत्वाच्या बातम्या :
मातब्बर गोलंदाज झुलन गोस्वामीच्या बायोपिकमधून बाहेर झाली विराटची पत्नी अनुष्का शर्मा, पण का?






