Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहितला कर्णधार बनविले खरे, मात्र, ‘हे’ तोटेही स्विकारावे लागणारच

रोहित शर्माला भारतीय संघाचा वनडे कर्णधार केल्याचे तोटे

December 9, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
rohit sharma 50

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa) भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ निवड समितीने जाहीर केलेल्या या संघात १८ जणांना संधी देण्यात आली.
निवड समितीने व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रोहित शर्माकडे टी२० सह वनडे संघाचे नेतृत्वदेखील देऊ केले आहे. या दौऱ्यावर आता रोहित पूर्णवेळ वनडे संघाचा कर्णधार म्हणून काम पाहिल. (New ODI Captain Rohit Sharma) काहींनी बीसीसीआयच्या या निर्णयाचे स्वागत केले तर, काहींनी याबाबत उलट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आज आपण रोहित शर्माला वनडे संघाचे कर्णधारपद दिले असले तरी त्याचे होणारे काही तोटे जाणून घेणार आहोत.

१) नवे नेतृत्व नाही येणार पुढे
रोहित शर्माला वनडे संघाचे नेतृत्व देऊ केल्यानंतर याचा पहिला तोटा भारतीय संघाला नेतृत्वाच्याच बाबतीत होऊ शकतो. रोहित सध्या ३४ वर्ष वयाचा आहे. त्यामुळे त्याच्या कोण्या युवा खेळाडूला हे नेतृत्व देऊ केले असते तर, त्या खेळाडूकडे आणखी काही वर्ष नेतृत्वगुण आत्मसात करण्याची संधी असती. रोहित जास्तीत जास्त तीन वर्षे आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द पुढे नेऊ शकतो.

२) राहुल, श्रेयस व रिषभवर अन्याय
सध्या भारतीय संघातील केएल राहुल, श्रेयस अय्यर व रिषभ पंत हे खेळाडू आयपीएलमध्ये नेतृत्व करतात. हे सर्व खेळाडू तीस पेक्षा कमी वयाचे आहेत. यापैकी कोणत्या खेळाडूस नेतृत्व दिले असते तर, भविष्यकालीन योजना म्हणून या गोष्टीचे कौतुक झाले असते.

३) फलंदाजीत घेऊ शकतो दबाव
रोहित शर्मा सध्या भारताचा अव्वल सलामीवीर आहे. त्यामुळे त्याच्यावर भारतीय फलंदाजीची अतिरिक्त जबाबदारी असते. अशा वेळी कर्णधार म्हणून धावा काढण्याचा दबाव रोहितवर असेल.

४) द्रविड यांच्याशी जुळवून घ्यावे लागणार
रोहित शर्मा हा आता मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार बनला आहे. मात्र, कसोटी संघाचे नेतृत्व अजूनही विराट कोहलीकडेच असेल. अशा परिस्थितीत संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी वेळोवेळी जुळवून घेण्याची कामगिरी रोहितला करावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘त्याच्यावर गांगुलीप्रमाणेच अन्याय’; विराटला कर्णधारपदावरून हटविल्यानंतर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

अरे काय चाललंय! बलाढ्य इंग्लंड संघाचे ऍशेसमध्ये लज्जास्पद प्रदर्शन, ६ फलंदाज एकेरी धावेवर बाद

रोहित वनडे संघाचा कर्णधार झाल्यानंतर उपकर्णधारपद रिक्त, ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रमुख दावेदार


Next Post
ben-stokes-no-ball

काय म्हणायचे आता? स्टोक्सने टाकले तब्बल १४ नो बॉल? मात्र, पंचांचे लक्षच नव्हते!

r-jadeja

धक्कादायक! 'सर' जडेजा करणार कसोटी क्रिकेटला अलविदा?

rohit-sharma-deccan-chargers

"मुंबई इंडियन्स नाही डेक्कन चार्जर्समध्ये रोहितच्या नेतृत्वास पैलू पडले"

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143