ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताला 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने, तर शेवटच्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. बुधवारी (22 मार्च) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडेत भारताने 21 धावांच्या अंतराने पराभव स्वीकारला. याचसोबत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने मायदेशातील पहिली मालिका गमावली.
रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताचा नियमित कर्णधार बनल्यापासून त्याच्या नेतृत्वात संघाने चांगले प्रदर्शन केले आहे. रोहितच्या नेतृत्वात भारताने मायदेशात आतापर्यंत एकही द्विपक्षीय मालिका गमावली नव्हती. पण ऑस्ट्रेलियाने बुधवारी अखेर रोहितचा हा विजयरथ थांबवला. रोहितने आतापर्यंत मायदेशात कर्णधार म्हणून खेळलेल्या 15 मालिकांपैकी 14 मालिका जिंकल्या आहेत. फक्त एका मालिकेत कर्णधार रोहितला पराभव स्वीकारावा लागला आहे, ती म्हणजे यावर्षीची ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका.
कर्णधार म्हणुन मायदेशात रोहित शर्माचे प्रदर्शन
द्विपक्षीय मालिका – 15
विजय – 14
पराभव – 1
दरम्यान, उभय संघांतील या मालिकेचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या सामन्यात भारत 5 विकेट्सच्या अंतराने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ 10 विकेट्स राखून जिंकला. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी ऑस्ट्रेलियाने 21 धावांच्या अंतराने नावावर केला. तिसऱ्या सामन्याचा हिरो ऍडम झंपा ठरला, ज्याने ऑस्ट्रेलियासाठी 4 विकेट्स घेतल्या. भारतीय संघाला विजायासठी 270 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे संघाला गाठता आले नाही. भारतासाठी एकट्या विराट कोहली याने अर्धशतक (54) केले.
तत्पूर्वी गोलंदाजी करताना हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियासाठी या शेवटच्या वनडे सामन्यात मिचेल मार्श (Mitchell Marsh) याने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. मार्शने या मालिकेत केलेल्या अप्रतिम कामगिरीसाठी त्याला मालिकावर म्हणून निवडण्यात आले.
(Rohit Sharma suffered his first home defeat as captain)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
या 4 कारणांमुळे 2003 विश्वचषक ठरला जगातील आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ क्रिकेट विश्वचषक
क्रिकेटमध्ये 20 वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ दु:खद घटना; बॉथमसोबत तुलना होत असलेल्या 24 वर्षीय खेळाडूने गमावला होता जीव