---Advertisement---

जेव्हा सुरेश रैना बोलतो मराठीत, रोहितही देतो मराठीत उत्तर

On: मंगळवार, मे 12, 2020 7:43 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा व फलंदाज सुरेश रैनाने आज इंस्टाग्राम लाईव्ह दरम्यान एकमेकांशी संवाद साधला. यावेळी रोहित शर्माने रैनाला त्याची दुखापत, तसेच आयपीएलची तयारी कशी केली याबद्दल संवाद साधला.

यावेळी रैनाने परदेशात आपल्या दुखापतीवर काम केले असल्याचे सांगितले. तसेच जमेल तसे रोहित लोकांना सध्या मदत करत असल्याचेही रोहितने सांगितले.

हा संवाद सुरु होण्यापुर्वी रैनाने रोहितला थेट मराठीत प्रश्न विचारला, “तु चांगला आहेस का?” यावर रोहितनेही मी थोडेसे हसत मराठीतच तो चांगला असल्याचे सांगितले.

या लाईव्ह सेशनच्या सुरुवातीलाच इंटरनेटमध्ये येत असलेल्या अडथळ्यांमुळे रोहित रैनावर वैतागला होता व त्याला लाईव्ह नीट करण्यास सांगितले.

सध्या रोहित शर्मा सतत इंस्टाग्रामच्या माध्यमातून आजी माजी खेळाडूंशी संवाद साधत आहे.

सुरेश रैनाने भारताकडून १८ कसोटी, २२६ वनडे व ७८ टी२० सामने खेळले आहेत. तो भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै २०१८मध्ये खेळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---