जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला अखेरच्या दिवशी लाजिरवाणा पराभव पाहावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघावर सडकून टीका होताना दिसते. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने आगामी काळात भारतीय संघातील बदलांविषयी भाष्य केले. अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या वनडे विश्वचषकात भारतीय संघ कशा पद्धतीने खेळणारी याविषयी रोहितने आपली प्रतिक्रिया दिली.
सामन्यानंतर झालेल्या अधिकृत पत्रकार परिषदेत बोलताना रोहितने संघाच्या पराभवामुळे सर्व व्यथित असल्याचे म्हटले. तसेच आगामी वनडे विश्वचषकात भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. या विश्वचषकात भारतीय संघ कशा पद्धतीने खेळणार याबद्दल बोलताना तो म्हणाला,
“ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वनडे विश्वचषकात आमचा संघ वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करेल. यावेळी विश्वचषकातील सामने खेळताना आम्ही कोणत्याही द्विधा मनस्थितीत राहणार नाही. आम्ही जशा पद्धतीचा विचार करतो तशा गोष्टी घडत नाहीत. त्यामुळे आम्हाला दृष्टिकोन बदलावा लागेल. आमचे ध्येय अगदी स्पष्ट असेल.”
जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेच्या पराभवानंतर भारतीय संघाचा आयसीसी ट्रॉफीच्या दुष्काळ कायम राहिला. 2013 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अखेरच्या वेळी चॅम्पियन ट्रॉफीच्या रूपाने आयसीसी स्पर्धा जिंकलेली. तेव्हापासून झालेल्या सलग आठ आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय संघाला विजय संपादन करता आला नाही.
यावेळी वनडे विश्वचषक भारतात आयोजित केला जाईल. भारतीय संघाने अखेरच्या वेळी भारतात झालेल्या वनडे विश्वचषकात विजय मिळवलेला. त्यामुळे तिसरा वनडे विश्वचषक जिंकण्याची संधी भारतीय संघाकडे यावेळी असेल.
(Rohit Sharma Talk About Changes In Attitude For ODI World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
“रोहितच्या नेतृत्वात आपण आयसीसी ट्रॉफी नाही जिंकू शकत”, माजी प्रशिक्षकाचे परखड मत
भारताच्या पराभवामागील खरे व्हिलन ‘हे’ 2 खेळाडू! नेटकरीही म्हणाले, ‘बीसीसीआयने त्यांना घेतलंच कशाला?’