टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघ बुधवारी (2 नोव्हेंबर) बांगलादेशविरुद्ध त्यांचा चौथा सामना खेळेल. भारताने पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि संघ ब गटाच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकून उपांत्य फेरीतील आपली जागा पक्की करण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार रोहित शर्मा याचा एक व्हिडिओ प्रसारण वाहिनी स्टार स्पोर्ट्सने सार्वजनिक केला आहे. यामध्ये रोहितने आपण संघातील खेळाडूंना कशाप्रकारे हाताळतो याचा खुलासा केला.
स्टार स्पोर्ट्स च्या सोशल मीडिया हँडलवर सार्वजनिक केलेल्या या व्हिडिओमध्ये रोहित आपले नेतृत्व, भारतीय संघ व भारतीय संघातील खेळाडू याविषयी बोलताना दिसतोय. रोहित म्हणाला,
https://twitter.com/StarSportsIndia/status/1587403172666134528?s=19
“नेतृत्व करणे नक्कीच सोपे काम नाही. संघातील सर्व खेळाडूंना योग्यरीतीने हाताळावे लागते. कारण सर्वांचे स्वभाव वेगळे असतात. प्रत्येकाचे विचार आणि मागणी देखील वेगळी असते. अशा परिस्थितीत तुम्हाला सर्वांना सोबत घ्यावे लागते. त्यानंतर तुम्ही त्यांना कसा प्रतिसाद देता यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात.”
रोहित पुढे बोलताना म्हणाला,
“कर्णधार झाल्यापासून मी शिकलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांना एक समान महत्त्व देणे. कारण, संघातील प्रत्येकाला हा विश्वास देणे आवश्यक असते की तो संघाचा महत्त्वाचा भाग आहे. सर्वांच्या समस्या ऐकून घ्याव्या लागतात आणि त्यांना सर्वोत्तम उपाय देखील सांगावा लागतो.”
रोहितने मागील वर्षी टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघाचा नियमित कर्णधार म्हणून पदभार स्वीकारला होता. तेव्हापासून भारतीय संघाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. सध्या सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून सहभागी झालाय.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बटलर शो’नंतर गोलंदाजांच्या जोरावर इंग्लंडचा शानदार विजय; न्यूझीलंडच्या खात्यात पहिली हार
यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कुणालाच जमलं नाही ते बटलरनं केलं! 100व्या टी-20 सामन्यात लावली विक्रमांची रास






