आयपीएल 2021 हंगामाला 9 एप्रिलपासून सुरू होणार असून यासाठी सर्व संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. परंतु, अनेक खेळाडूंना संघांशी जोडण्यापूर्वी कोरोना विषाणूपासून संरक्षणासाठी आपला 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. यातून केवळ त्याच खेळाडूंना सुटका देण्यात आली आहे जे आंतरराष्ट्रीय मालिका खेळून राष्ट्रीय संघाच्या बायोबबलमधून थेट आपल्या आयपीएल संघाच्या बायोबबलमध्ये प्रवेश करणार आहेत. याव्यतिरिक्त सर्व खेळाडूंना क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे अनिवार्य आहे.
या नियमानुसार सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला देखील क्वारंटाईनध्ये राहावे लागणार आहे. वॉर्नर आयपीएल 2021 साठी भारतात पोहोचला आहे. हैदराबाद संघाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे ही माहिती दिली आहे. हैदराबादचा संघ आपला पहिला सामना 11 एप्रिल रोजी चेन्नई येथे कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध खेळणार आहे.
डेव्हिड वॉर्नरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करताना म्हटले आहे की, “मी भारतात आलो असून मैदानात उतरण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे.परंतु कोरोनाच्या समस्येमुळे मला पुढील काही दिवस क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. तर या क्वारंटाईनमध्ये मी काय करावे. याबद्दल कृपया आपण मला काही कल्पना द्यावी. आपले उत्तर टिप्पणी मध्ये द्यावे.”
https://www.instagram.com/p/CNME_ySFI7D/
डेव्हिड वॉर्नरच्या या व्हिडिओवर रोहित शर्माने चिमटा काढला आहे. त्याने या इंस्टाग्रामच्या पोस्टवर भाष्य करताना त्याने म्हटले आहे की, “तुला टिक-टॉकची खूप आठवण येत असेल.” यामागचे कारण असे की,डेव्हीड वॉर्नर हा चिनी ऍप टिक-टॉक वरती खूप सक्रिय आहे. परंतु गेल्या वर्षी भारतात या ऍपवर बंदी घालण्यात आली आहे.
वॉर्नर क्वारंटाईन कालावधीनंतर सनरायझर्स हैदराबाद संघाशी जोडला जाईल. हैदराबादचे जवळपास सर्व खेळाडू चेन्नईमध्ये दाखल झाले आहेत. पण त्यातील काही खेळाडू सध्या क्वारंटाईन आहेत. हैदरबाद संघाला त्यांचे साखळी फेरीतील पहिले ५ सामने चेन्नईमध्ये खेळायचे आहेत. त्यांचा पहिला सामना ११ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
लग्नापूर्वी केलेल्या विधानावर किंग कोहलीची पत्नी अनुष्काची पल्टी? व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
आरसीबीच्या हॅशटॅगला चेन्नईची जर्सी! ट्विटरकडून मोठी चूक होताच संघांकडून आल्या ‘या’ प्रतिक्रिया
आयपीएलच्या सर्व संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल…