नेहमी व्यस्त असणार्या क्रिकेटपटूंना कोरोना व्हायरसमुळे बराच मोकळा वेळ मिळाला आहे. जे की ते आता आपल्या कुटुंबाबरोबर घालवत आहेत. घरी राहण्यास भाग पाडलेले खेळाडू कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्वत: ला व्यस्त ठेवण्याच्या प्रयत्नात गुंतलेले आहेत. अशात लॉकडाऊन दरम्यान बरेच क्रिकेटपटू सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत.
काही खेळाडू जिम करत असतानाचा व्हिडिओ शेअर करतात, तर काही त्यांच्या मोकळ्या वेळेत सोशल मीडियावर एकमेकांना आव्हान देताना दिसत आहेत. दरम्यान भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने एक फोटो शेअर केला आहे आणि तो वेळ कसा घालवत आहे हे सांगितले. परंतु रोहित शर्माला (Rohit Sharma) त्याची ही पद्धत आवडली नाही आणि रहाणेला त्याने क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला.
रहाणेने शेअर केलेल्या फोटो तो लॅपटॉपवर काहीतरी लिहिताना दिसत आहे. त्याने त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “दररोज मी स्वत: साठी थोडा वेळ काढतो. जेथे मी काही गोष्टींचा विचार करतो. त्यावर मी लिहीत असतो आणि काही जुने फोटो पाहत असतो. हे माझ्या डोक्याला शांत ठेवण्यास मदत करतात.”
मात्र हा रहानेचा नवीन छंद रोहितला आवडला नाही आणि त्याने रहाणेला ट्रोल केले. रहाणेच्या पोस्टला उत्तर देताना रोहितने लिहिल, “खरंच भाऊ, तू शक्य तितक्या लवकर खेळणे सुरू केले पाहिजे.”
रोहित आपल्या सहकारी खेळाडूंचे पाय खेचण्यात मागे नाही. रहाणेपूर्वी त्याने भारतीय यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आणि फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांनाही ट्रोल केले आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्यासोबत इंस्टाग्रामवर लाईव्ह असताना रोहितने विनोदपूर्वक चहलला त्याच्या टिकटॉक व्हिडिओसाठी ट्रोल केले होते. बुमराह म्हणाला, “आता चहल टिकटॉक स्टार झाला आहे.” त्यावर रोहित म्हणाला होता, “तो मूर्ख गोष्टी करतो.”
Seriously bro you need start playing ASAP 🤔 https://t.co/VBAVtsB41s
— Rohit Sharma (@ImRo45) June 10, 2020
रोहित शर्मा म्हणाला, “तो रन सिनेमातील अभिनेता विजय राज सारखा विनोद करतो.” चहलने आपल्या वडिलांसोबत टिकटॉक व्हिडिओ बनविला होता. त्यावर रोहित त्याला म्हणाला होता, “चहल काही तरी लाज बाळग, आपल्या वडिलांनाही तुझ्याबरोबर टिकटॉक वर नाचवत आहे.”