भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आगामी हंगामासाठी पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने नुकताच टी20 विश्वचषक जिंकला. भारतीय संघाचे खेळाडू सध्या विश्रांतीवर आहेत. दरम्यान, 21 ऑगस्ट रोजी मुंबईत क्रिकेट पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. जिथे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने अनेक मोठे खुलासे केले आहेत. टी20 विश्वविजेतेपद पटकावल्यानंतरही तो थांबणार नसल्याचे रोहित शर्माचे मत आहे. शो दरम्यान जेव्हा त्याला त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो यावर मोकळेपणाने बोलला.
भारतीय कर्णधार म्हणून त्याच्या ध्येयांबद्दल विचारले असता रोहित म्हणाला की, “मी पाच आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे हे एक कारण आहे. मी थांबणार नाही. एकदा का तुम्हाला सामने जिंकण्याची, आणि ट्रॉफी जिंकण्याची चव चाखायला मिळाली की, तुम्हाला थांबायचे नसते. आम्ही पुढे जात राहू, भविष्यात आणखी मोठ्या गोष्टींसाठी लढू.”
रोहित पुढे म्हणाला की, “आमच्यासमोर काही मुख्य दौरे आहेत आणि ते खूप आव्हानात्मकही आहेत. आमच्यासाठी जिंकत राहण्याची इच्छा कधीच थांबत नाही. एकदा तुम्ही एखादी गोष्ट साध्य केली की, तुम्ही नेहमी तशा गोष्टींसाठी प्रयत्न करता. मला खात्री आहे की, माझे सहकारीही असाच विचार करत असतील. भारतीय क्रिकेटसाठी हा एक रोमांचक काळ आहे.”
“खरे सांगायचे तर, गेल्या दोन वर्षांत मी भारतीय क्रिकेटमध्ये जे काही पाहिले आहे, त्यावरून खरोखरच खूप उत्साह असल्याचे दिसते. पुढे येणाऱ्या प्रत्येक संधीचा आम्ही फायदा घेऊ.” असे रोहितने सांगितले. भारतीय संघ आपल्या नव्या हंगामाची सुरुवात बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांनी करेल. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका होणार आहे. तर, वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराची भारताला चेतावणी, वाचा काय म्हणाला?
हरभजन सिंगच्या सल्ल्यामुळे कोहली आहे दिग्गज खेळाडू? माजी खेळाडूने केला खुलासा
मोहम्मद शमी किती श्रीमंत आहे? वाढदिवसादिनी जाणून घ्या एकूण संपत्ती