विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने टी-20 मालिकेतील तिसरा सामना 6 विकेट्सने जिंकला. ऑस्ट्रेलियन संघासाठी हा तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील सलग दुसरा पराभव ठरला आणि त्यांनी मागिला देखील गमावली. भारताने ही मालिका 2-1 अशा अंतराने जिंकली असली तरी संघाचा कर्णधार रोहित शर्मा पूर्णपणे खुश दिसला नाही. त्याच्या मते संघात असे काही विभाग आहेत, ज्याठिकाणी अजूनही खूप सुधारणा केली जाऊ शकते.
उभय संघातील या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाजांचे प्रदर्शन चांगले होते, पण गोलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरताना दिसले. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघासाठी सर्वात महागात पडला. बुमराहने टाकलेल्या 4 षटकांमध्ये 50 धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. भुवनेश्वर कुमारला तीन षटकांमध्ये 39 धावा दिल्या आणि एक विकेट घेऊ शकला. तसेच वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) याने दोन षटकांमध्ये 18 धावा दिल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. भारताने मालिका जिंकली असली, तरी रोहित शर्मा (Rohit Sharma) गोलंदाजांच्या प्रदर्शनाने समाधानी नसल्याचेच दिसले.
गोलंदाजांच्या प्रदर्शनाविषयी बोलताना रोहित म्हणाला की, “खूप साऱ्या विभागांमध्ये सुधारणा होऊ शकते. खासकरून शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करणाऱ्यांमध्ये. ते दोघेही (पर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह) मोठ्या विश्रांतीनंतर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियासमोर मध्यक्रमात आणि शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करणे कठीण असते. यावर लक्ष्य नाही दिले पाहिजे. ते विश्रांतीनंतर पुनरागमन करत आहेत आणि पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी त्यांना वेळ लागेल.”
संघ जेव्हा चांगले प्रदर्शन करतो, तेव्हा ते पाहून बरे वाटते असेही रोहित पुढे म्हणाला. “हा एक अप्रतिम क्षण होता. आम्हाला चांगले प्रदर्शन करायचे होते आणि आम्ही तसेच केले. सर्वात मोठी सकारात्मक बाब होती ती म्हणजे, वेगवेगळ्या खेळाडूंनी गोलंदाजी आणि फलंदाजीत महत्वाचे योगदान दिले. जेव्हा तुम्ही बसून हे सर्व होताना पाहता, तेव्हा संघ व्यवस्थापनाच्या रूपात चांगले वाटते,” असे रोहित म्हणाला.
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना विराटच्या 7 विकेट्सच्या नुकसानावार 186 धावांची केल्या. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य 19.4 षटकांमध्ये आणि चार विकेट्सच्या नुकसानावर गाठले. भारताच्या विजयासाठी विराट कोहलीने 63, तर सूर्यकुमार यादवने 69 धावांची धुवाधार खेळी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सूर्याच्या स्फोटक खेळीने टीम इंडियाचा ‘विराट’ विजय! मालिका 2-1 ने नावावर; सलग 10 वी मालिका खिशात
बापू भारी छे! मालिकावीर अक्षरचे ऑस्ट्रेलियाला सापडले नाही उत्तर
हैदराबाद टी20: ग्रीनच्या तडाख्यात सापडले भारतीय गोलंदाज; 19 चेंडूवर ठोकले वादळी अर्धशतक