इंग्लंडचा युवा फिरकी गोलंदाज शोएब बशीर भारत दौऱ्यासाठी तयार होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका गुरुवारी (25 जानेवारी) सुरू होत आहे. पण बशीरला यूएईमधून भारताचा विजा मिळाला नाहीये. याच कारणास्तव त्याला इंग्लंडला परत जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला प्रश्न विचारला गेला. रोहितने बशीर लवकर भारतात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. पण यावेळी त्याने पत्रकारांना चिमटा देखील काढला.
इंग्लंडचा 29 वर्षीय फिरकीपटू शोएब बशीर (Shoaib Bashir) मुळचा पाकिस्तानचा आहे. भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना इंग्लंडला हैदराबादमध्ये राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळायचा आहे. या सामन्यात बशीर इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकत होता. त्याला पहिल्यांदाच कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी हैदराबादमध्ये मिळू शकत होती. पण यूएईमधून वेळत भारताचा विजा न मिळाल्यामुळे हे आता शक्य दिसत नाही.
बशीरला संघासोबत भारतात येता न आल्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स यानेही नाराजी केली. बुधवारी (24 जानेवारी) रोहित शर्मा याने पहिल्या कसोटी सामन्याआधी पत्रकार परिषदेला हजेरी लावली. यावेळी त्याला शोएब बशीरविषयी प्रश्न विचारला गेला. रोहितने पत्रकाराची फिरकी घेत उत्तर दिले की, “तसे पाहिले तर, मी विजा कार्यलयात बसून निर्णय घेऊ नाही. पण मला आशा आहे की, तो लवकरच भारतात येऊ खेळू शकेल.” बशीरला भारतीय दुतावासाकडून खास मंजूरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बशीरला भारताचा विजा न मिळाल्यामुळे दुसरीकडे बेन स्टोक्स देकील निराश झाला आहे. स्टोक्स म्हणाला की, “कर्णधार म्हणून माझी निराशा होत आहे. आम्ही डिसेंबरमध्येच संघाची घोषणा केली होती. आता बशीरला विजा मिळत नाहीये. अशा परिस्थितीत अडकलेला तो पहिला क्रिकेटपटू नाहीये. मी अशा अनेक खेळाडूंसोबत खेळलो आहे, ज्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे.”
दरम्यान, मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा यालाही भारताचा विजा मिळम्यात अडचण आली होती. तसेच मुळचा पाकिस्तानचा असणारा साकिब महमूद 2019 मध्ये भारत ए संघाविरुद्ध खेळण्यासाठी इंग्लंड संघाचा भाग बनू शकला नव्हता. (Rohit Sharma’s cash statement in Shoaib Bashir visa case)
महत्वाच्या बातम्या –
ICC Awards । वर्ल्डकप गाजवणाऱ्या रचिनला मिळाला मोबदला, भारतीय सलामीवीराला मागे टाकत जिंकला आयसीसीचा सन्मान
क्रिकेटर ऑफ द इयर बनल्यानंतर गिल इमोशनल, विराटचं नाव घेत म्हणाला…