भारतीय वनडे आणि टी-२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हा क्रिकेटच्या मैदानात आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या या फलंदाजाला, पत्रकार परिषदेत अनेकदा मजेशीर प्रतिक्रिया देतानाही पाहिलं गेलं आहे. वनडे क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतक झळकावणाऱ्या रोहितने, २०१९ विश्वचषक स्पर्धेत ५ शतक झळकावले होते. याच स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यानंतर रोहितने एका पाकिस्तानी पत्रकाराला मजेशीर प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले होते.
रोहित शर्माला एका पाकिस्तानी पत्रकाराने सामना झाल्यानंतर प्रश्न विचारला होता की, “तुम्ही पाकिस्तानी फलंदाजांना या समस्येतून बाहेर येण्यासाठी काय सल्ला द्याल? यावर भारतीय संघाच्या हिटमॅनने मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटले होते की, “मी जर पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक झालो तर नक्की सांगेल, आता काय सांगू.”
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १६ जून २०१९ रोजी विश्वचषक स्पर्धेत रंगतदार सामना पहायला मिळाला होता. या सामन्यात रोहित शर्माने १४० धावांची खेळी केली होती. तसेच भारतीय संघाने या सामन्यात विजय देखील मिळवला होता. रोहितला उत्कृष्ट फलंदाजी केल्यामुळे, सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. (Rohit Sharma’s epic reply to Pakistani journalist)
#OnThisDay two years ago, Rohit Sharma was on top form 😅 pic.twitter.com/TtKGYCCrm3
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 16, 2021
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटक अखेर ५ बाद ३३६ धावा केल्या होत्या. यामध्ये रोहित शर्माने १४० धावा आणि कर्णधार विराट कोहलीने ७७ धावांचे योगदान दिले होते. परंतु पाकिस्तान संघाची फलंदाजी सुरू असताना पावसाने हजेरी लावली होती.
ज्यामुळे सामना काही वेळ थांबवण्यात आला होता. त्यानंतर शेवटच्या ५ षटकांमध्ये पाकिस्तान संघाला १३६ धावांची आवश्यकता होती. परंतु त्यांना अवघ्या ४६ धावा करण्यात यश आले होते. हा सामना भारतीय संघाने ८९ धावांनी जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लिशसह ‘या’ भारतीय भाषांमध्ये होणार WTC Final चे थेट प्रसारण; मराठीचा मात्र समावेश नाही
अरेरे! पावसात ‘हेलिकॉप्टर शॉट’ मारताना खेळाडूचे जमिनीवर लोटांगण, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
कशी झाली होती रितिकासोबत भेट अन् काय होती युवराजची धमकी? रोहित शर्माने केला उलगडा