भारतीय संंघ टी20 विश्वचषकाच्या उंपात्य फेरीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेला. भारतीय संंघ मागील 9 वर्षापासून एकही आयसीसी स्पर्धा जिंकू शकला नाही. भारताने आपला शेेवटचा आयसीसी स्पर्धा 2013मध्येे आयसीसी चॅम्पियंस ट्रॉफीच्या स्वरुपात जिंकली होती. भारतीय संघ आता आपला पुढचा विश्वचषक 2023मध्ये खेळेल. या एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन भारतातच होणार आहेे. भारतीय संघ आपल्या विश्वचषकाचा दुष्काळ कशा प्रकारे समाप्त करु शकतो, याबाबत रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा याचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी विश्वचषक जिंकण्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की भारतीय संघाला सध्या वर्कलोड मॅनेजमेंटवर लक्ष देण्याची गरज आहे. कर्णधाराबरोबरच त्यांनी भारतीय संघाला देखील संदेश दिला. दिनेश लाड यांच्या मते, भारतीय संघाला कामाचा तणाव कमी करण्यासाठी जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले पाहिजे.
एका वृत्त संस्थेशी बोलताना लाड म्हणाले की, “मला वाटते की भारतीय संघ मागच्या सात-आठ महिन्यांपासून स्थिर नाहीये. जर आपण विश्वचषकाची तयारी करतोय, तर आपला एक प्रस्थापित संघ हवा. मागच्या सात-आठ महिन्यापासून संघात सलामीसाठी कोणताही फलंदाज येतोय, गोलंदाजीही कोणीही करत आहेे, कोणतीच स्थिरता संघात दिसत नाही.”
लाड पुढे म्हणाले की,” जर तुम्हाला विश्वचषक जिंकायचा असेल तर आयपीएल खेळणे बंद करायला हवे. जास्तीत जास्त सामने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले गेले पाहिजे, कारण त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं. आंतरराष्ट्रीय सामने खेेळताना कोणतीही तडजोड करु नका.”
भारतीय संघाचा विश्वचषकाचा दुष्काळ 13 वर्षांपासून तसाच आहे. विश्वचषकात भारतीय संघ चोकर्स म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. 2023चा एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार असुन भारतानेे हा विश्वचषक जिंकावा असे प्रत्येक भारतीय चाहत्याला वाटते. (Rohit Sharma’s former Coach Dinesh Lad has explained what should be done to win world cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘धवन नेहमीच स्पॉटलाइटपासून लांंब राहिला’, विराट-रोहितचे नाव घेत शास्त्रींचे मोठे विधान
रमीझ राजांनी टीम इंडियाला पुन्हा डिवचले! म्हणाले, “तुम्हाला वाईट वाटेल पण मी सांगतो…”