इंग्लंडमध्ये शतक झळकावणे हे प्रत्येक फलंदाजाचे स्वप्नं असते. कारण लॉर्ड्स आणि ओव्हल सारख्या मैदानावर शतक झळकावल्यानंतर त्या फालंदाजाचे नाव ऑनर्स बोर्डवर लिहिले जाते.
क्रिकेटमध्ये एखाद्या मैदानावरील ऑनर्स बोर्डवर त्याच खेळाडूंची नावे लिहिली जातात, ज्यांनी त्या मैदानावर शतकी खेळी केलेली असते, किंवा डावात ५ विकेट्स किंवा सामन्यांत १० विकेट्स घेतलेल्या असतात.
ओव्हल कसोटीदरम्यान हा मान आता रोहित शर्माला देखील मिळाला आहे. ज्याचे फोटो सरे काउंटी क्रिकेट ग्राउंडच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.
सध्या इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात रोहित शर्माने १२७ धावांची शतकी खेळी केली होती.
या खेळीनंतर रोहित शर्माचेही नाव ओव्हल मैदानाच्या ऑनर्स बोर्डवर सुवर्ण अक्षरात लिहिले आहे. ही माहिती सरे काउंटी क्रिकेट ग्राउंडच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर करत देण्यात आली आहे. यामधील एका फोटोमध्ये रोहित शर्मा आपले शतक साजरे करताना दिसून येत आहे. तर इतर दोन फोटोमध्ये रोहितचे नाव ऑनर्स बोर्डवर लिहिल्याचे दिसून येत आहे. याबरोबरच बीसीसीआने देखील या ऑनर्स बोर्डचा फोटो शेअर केला आहे.
💯 There's a new name on our Honours Boards.
Congratulations, @ImRo45! pic.twitter.com/LPfGGGPRR6
— Surrey Cricket (@surreycricket) September 5, 2021
अनेक दिग्गज खेळाडूंनी झळकावले आहे ओव्हलच्या मैदानावर शतक
रोहितच्या आधी केएल राहुल आणि रिषभ पंतने देखील ओव्हलच्या मैदानावर शतक झळकावले आहे. तसेच या मैदानावर अनिल कुंबळे यांच्या नावे देखील शतकाची नोंद आहे. तर राहुल द्रविडने या मैदानावर २००२ मध्ये दुहेरी शतक आणि २०११ मध्ये नाबाद १४६ धावांची खेळी केली होती. आता या खेळाडूंमध्ये रोहित शर्माच्या नावाची देखील नोंद झाली आहे.(Rohit Sharma’s name on honours board of oval)
Inscribed at The Oval Honours Board – @ImRo45 👏👏#TeamIndia pic.twitter.com/8OWOGaoMa0
— BCCI (@BCCI) September 5, 2021
रोहितने दुसऱ्या डावात केएल राहुल सोबत मिळून भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. केएल राहुल (४६) बाद झाल्यानंतर त्याने चेतेश्वर पुजारासोबत (६१) देखील महत्वपूर्ण भागीदारी केली होती. त्याने या डावात २५६ चेंडूंचा सामना करत १२७ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने १४ चौकार आणि १ षटकार लगावला होता.
भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला देखील चांगली सुरुवात मिळाली आहे. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी मिळून ७७ धावा जोडल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे टॉप ३ खेळाडू; एका भारतीय खेळाडूचाही समावेश
रनमशीन कोहलीसाठी ‘या’ गोलंदाजांची फिरकी ठरतेय डोकेदुखी, सर्वाधिकवेळा झालाय बाद