भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका शुक्रवारी (17 मार्च) सुरू होत आहे. वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाचा नियमित कर्णदार रोहित शर्मा याने पहिल्या सामन्यातून माघार घेतली. रोहितच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार आहे. त्याव्यतिरिक्त संघाचा मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यर देखील दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर झाला आहे. अशात चाहते आठवण काढत आहे ती, संजू सॅमसन याची. माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्रा यानेही सॅमसनसाठी एक ट्वीट केले.
आगामी आयसीसी वनडे विश्वचषकाला 7 महिन्यांपेक्षा कमी वेळ राहिला आहे. पण विश्वचषकाआधी भारतीय संघात दुखापतींचे सत्र सुरू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातून नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे. तर मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यर पाठिच्या दुखापतीमुळे या पूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. हे खेळाडू खेळणार नसून देखील बीसीसीआयने यांचे पर्यायी खेळाडून घोषित केले नाहीत. याच पार्श्वभूमीवर संजू सॅमसन (Sanju Samson) याला संघात घेतले पाहिजे होते का? असा प्रश्न आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने विचारला.
रोहित आणि श्रेयस यांच्या अनुपस्थितीत भारताला पहिल्या वनडेत फलंदाजांची कमतरता जाणवू शकतो. आकाश चोप्राने नेमका हाच मुद्दा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या पुढे मांडला. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “रोहित शर्मा पहिल्या वनडे सामन्यासाठी उपलब्ध नाहीये. अशात संजू सॅमसनला संघात सामील केले पाहिजे का?”
Rohit isn’t available for the first ODI. Shreyas isn’t available for the entire series. Shouldn’t Sanju Samson be included in the squad? #IndvAus #ODI
— Aakash Chopra (@cricketaakash) March 16, 2023
दरम्यान, संजू सॅमसनचे 2022 मधील वनडे प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. त्याने या वर्षभरता काही सामन्यांमध्ये अप्रतिम खेळी केली. मागच्या वर्षी त्याने 71 च्या सरासरीने 10 सामन्यांमध्ये 284 धावा केल्या होत्या. असे असले तरी 2023 मध्ये संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांकडून सॅमसनकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले. संघाचा नियमित यष्टीरक्षक रिषभ पंत मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या अपघातात गंभीर दुखापतग्रस्त झाला. पंतच्या दुखापतीनंतर देखील सॅमसनला न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध वनडे मालिकेत संधी मिळाली नाही.
(Rohit, Shreyas not in the team why Samson does not have a chance? The former veteran also raised the question)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शोएब अख्तरचे ‘हे’ विधान चर्चेत, जाणून घ्या आधार कार्डविषयी काय म्हणाला पाकिस्तानी दिग्गज
बाबर म्हणतोय, “आयपीएल नव्हेतर बिग बॅश सर्वोत्तम”, चाहत्यांनी घेतला चांगलाच समाचार






