येत्या ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमीयर लीगलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगमासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा देखील सोमवारी(२९ मार्च) संघात दाखल झाला आहे. त्याच्यासह अडीच वर्षांची मुलगी समायरा आणि त्याची पत्नी रितिका देखील आहे. दरम्यान, समायराचा एक क्यूट व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती रोहितच्या पुल शॉटची कॉपी करतानाही दिसत आहे.
समायराचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की समायराला रोहित मुंबई इंडियन्सचे हेल्मेट घालत आहे. तसेच तिने हेल्मेट घातल्यानंतर रितिकाने तिला विचारले की रोहित षटकार कसा मारतो. त्यावर समायरा त्याच्या पुलशॉटची नक्कल करताना दिसत आहे. तसेच ती हेल्मेट घातल्यानंतर यष्टीरक्षकासारखी दिसले, असे कोणीतरी म्हटल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येते. त्यावेळी रितिका तिला म्हणते की ती रिषभ पंतसारखी दिसते. याशिवाय हेल्मेटवरील मुंबई इंडियन्सचा लोगोही समायराने योग्य ओळखल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसते.
समायराचा हा क्यूट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल असून त्याला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
From a mini pull-shot 😍 to an MI cheer chant ➡️ Sammy’s #IPL2021 plan is ready ✅#OneFamily #MumbaiIndians @ImRo45 @ritssajdeh pic.twitter.com/vPnTCjLVLc
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2021
रोहित आयपीएल २०२१ साठी शनिवारी (२९ मार्च) मुंबई इंडियन्स संघात दाखल झाला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली यंदा मुंबई इंडियन्स आयपीएलचे ६ वे विजेतेपद जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
मुंबईच्या मोहिमेला चेन्नईपासून सुरुवात
आयपीएल २०२१ चे आयोजन कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने ते थोडे वेगळ्याप्रकारे करण्यात आले आहे. यंदा कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी प्रत्येक संघ साखळी फेरीदरम्यान केवळ ३ वेळाच प्रवास करेल अशा प्रकारे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कोणताही संघ यंदा आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही.
त्यामुळे मुंबई इंडियन्यची आयपीएल २०२१ची मोहिम यंदा चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममधून सुरु होईल. मुंबईला पहिले ५ सामने चेन्नईमध्ये खेळायचे आहे. मुंबईचा पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध ९ एप्रिलला होईल.
असा आहे मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२१ साठी संघ –
रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तारे (यष्टीरक्षक), किरोन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान, नेथन कुल्टर नाईल, ऍडम मिल्ने, पियुष चावला, जेम्स निशम, युधविर चरक, मार्को जेन्सन, अर्जुन तेंडूलकर.
महत्त्वाच्या बातम्या –
याला म्हणतात नशीब! लिलावात खरेदीदार न मिळालेल्या रॉयचा आयपीएल २०२१साठी ‘या’ संघात झाला समावेश
रोहित-सचिन तर सर्वांनाच माहित आहे, परंतू हे ५ सितारेही झाले होते मुंबईचे कर्णधार
‘या ‘दिवशी किंग कोहली करतोय आरसीबीच्या ताफ्यात प्रवेश