भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम प्रदर्शन केले. रोहितने मागच्या मोठ्या काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये शतक केले नव्हते. शुक्रवारी (10 फेब्रुवारी) अखेर कसोटी फॉरमॅटमधील रोहितच्या शतकाचा दुष्काल संपला. रोहितने 171 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने हे शतक साकारले.
https://twitter.com/BCCI/status/1623947319044640768?s=20&t=quZmJrSMC9fEGYdWuODziQ
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन करताना दिसला. रोहितने देखील कर्णदारपदाला साजेशे प्रदर्शन केले आणि कसोटी कारकिर्दीतील 9वे शतक ठोकले. रोहितने या सामन्याआधी 2 सप्टेंबर 2021 रोजी इंग्लंडविरुद्ध शेवटचे कसोटी शतक ठोकले होते. लंडनच्या द ओव्हल स्टेडियवर खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात रोहितने पहिल्या डावात 127, तर दुसऱ्या डावात 138 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दरम्यानच्या काळात रोहित कसोटी शतक करू शकला नव्हता. पण शुक्रवारी त्याने या फॉरमॅठमध्ये पुन्हा लय मिळवली.
रोहितने हे शतक करताच स्वतःच्या नावावर काही मोठे विक्रम केले. रोहित शर्मा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅठमध्ये (कसोटी, वनडे आणि टी-20) कर्णधार म्हणून खेलत असताना शतक करणारा पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी भारताचा एकही कर्णधार क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करू शकला नव्हता.
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात मोठी धावसंख्या करता आली नाही. रविंद्र जडेजा याच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 177 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 1 बाद 77 धावा केल्या. रोहित शर्मा आणि रविचंद्रन अस्विन यांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ 77 धावांपासून सुरू केला. अश्विनपाठोपाट चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाले. पण रोहित मात्र खेळपट्टीवर टिकून राहिला. (Rohit’s Test century drought ends, becomes Australia’s biggest headache in Nagpur Test)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नागपूर कसोटीच्या खेळपट्टीविषयी जडेजाची मोठी प्रतिक्रिया, ऑस्ट्रेलियन स्पिनर्सलाही दिला खास सल्ला
IND vs AUS : कसोटी सामन्यात विराटकडून मोठी चूक, ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणाला…






