इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर खेळला गेला. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचे सर्व गडी बाद झाल्याने यजमान इंग्लंडने एक डाव आणि ७६ धावांनी मोठा विजय साजरा केला. यासह मालिका १-१ अशी बरोबरीत आली. या सामन्यानंतर उभय कर्णधारांनी प्रतिक्रिया दिल्या.
गोलंदाजांना विजयाचे श्रेय
मालिकेत बरोबरी साधल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट म्हणाला, “ही गोलंदाजांची अप्रतिम आणि निर्दोष गोलंदाजी होती. आमच्या गोलंदाजांनी पहिली तीन षटके निर्धाव टाकत भारतीय फलंदाजांवर दबाव आणला. जेम्स अँडरसनने स्वत: शानदार गोलंदाजी करत इतरांना प्रेरित केले. फलंदाजांनी देखील अमूल्य योगदान दिले. हाच फॉर्म आम्ही ओव्हलमध्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.”
💬"A fantastic, clinical performance. When those chances came we were ruthless and took them."💬
The England skipper Joe Root now to reflect on a thumping third Test win. #ENGvIND 🏴🇮🇳🏏
📺 Watch 👉 https://t.co/N5yEvBmzDs
📱 Blog 👉 https://t.co/2LY8DKcNvX pic.twitter.com/WdM82S7lUQ— Sky Sports Cricket (@SkyCricket) August 28, 2021
मोठ्या धावसंख्येच्या दबावाखाली आले खेळाडू
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, “आमचे खेळाडू मोठ्या धावसंख्येच्या दबावाखाली आले. पहिल्या दिवशी ८० धावांच्या आत सर्वबाद झाल्यानंतर पुनरागमन करणे काहीसे अवघड असते. मधल्या फळीने अधिक धावा बनवायला हव्यात. दरवेळी तळाचे फलंदाज सावरणार नाहीत. यांच्या विजयाचे श्रेय गोलंदाजांना द्यायला हवे. ते जिंकण्याचे दावेदार होते.”
💬"When you're out for under 80 in the first innings, you're always up against it."💬
India captain reflects on his side's heavy defeat in the third Test at Headingley. #ENGvIND 🏴🇮🇳🏏
📺 Watch 👉 https://t.co/N5yEvBmzDs
📱 Blog 👉 https://t.co/2LY8DKcNvX pic.twitter.com/eQRhTmStfp— Sky Sports Cricket (@SkyCricket) August 28, 2021
भारताचा दारुण पराभव
लॉर्ड्स येथील दुसरी कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघ या सामन्यात विजयाच्या ध्येयाने उतरला होता. मात्र, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आणला. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने पुन्हा एकदा शानदार शतक व इतर तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावत इंग्लंडला ३५४ धावांची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या डावात भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाखेर २ बाद २१५ धावा करत पुनरागमन केले होते. मात्र, चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारताचे उर्वरित आठ गडी बाद झाल्याने भारताला एक डाव आणि ७६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
जो रुटच इंग्लंडचा ‘नंबर वन’ कर्णधार! वॉन, स्ट्रॉससारखे दिग्गजही पडले मागे
शतकाच्या दुष्काळातही कोहलीचा ‘विराट’ कारनामा; लीड्स कसोटीत अर्धशतकासह धोनीला पछाडलं
दारूण पराभवानंतर विराट ‘या’ नकोश्या यादीत दुसऱ्या स्थानी