---Advertisement---

फॅब ४मध्ये रुटचा धुमाकूळ, तर विराट खातोय गटांगळ्या, स्मिथ-विलियम्सन आसपासही नाहीत

On: रविवार, जून 5, 2022 10:22 PM
Joe-Root-Kane-Williamson-Virat-Kohli
---Advertisement---

क्रिकेटमधील तिन्ही प्रकारांपैकी फलंदाजीसाठी कसोटी प्रकार सर्वात कठीण मानला जातो. त्यामुळेच एखादा फलंदाज जेव्हा कसोटी सामन्यांत शतक झळकावतो, तेव्हा त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतो. सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जो रुट याने शतक झळकावले आहे. त्याने शतक झळकावून कसोटी क्रिकेटमध्ये १०हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. असे लक्ष्य साध्य करणारा रुट जगातील १४वा खेळाडू ठरला आहे.

जो रुट (Joe Root) याचे कसोटी क्रिकेटमधील हे २६ वे शतक आहे, तर डिसेंबर २०१९ पासून त्याने आतापर्यंत ९ शतके झळकावली आहेत. डिसेंबर २०१९ पासून जितके शतक रूटने झळकावले आहेत, तितके फॅब४ चे इतर ३ फलंदाज म्हणजे केन विलियम्सन (Kane Williamson), स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि विराट कोहली (Virat Kohli) मिळून करू शकले नाहीत. यावरून रूटचा फॉर्म कमालीचा असल्याची कल्पना येते.

दरम्यान, डिसेंबर २०१९ नंतर सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत केन विलियम्सन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने कसोटीत ३ शतके झळकावली आहेत. स्टीव्ह स्मिथच्या बॅटने केवळ एकच शतक झळकावले आहे. या बाबतीत विराट कोहली सर्वात वाईट आहे, जो डिसेंबर २०१९पासून एकही शतक करू शकला नाही. २२ नोव्हेंबर, २०१९ रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर बांगलादेशविरुद्ध बॅटने कसोटीतील त्याचे शेवटचे शतक झळकले.

फॅब ४द्वारे कसोटीतील शतके (२०२०पासून)
९- जो रूट*
३- केन विलियम्सन
१- स्टीव्ह स्मिथ
०- विराट कोहली

रुटची कसोटी कारकीर्द
रुटने आतापर्यंत ११८ कसोटी सामन्यांतील २१८ डावात फलंदाजी करताना ४९.५७च्या सरासरीने १००१५ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने २६ शतके आणि ५३ अर्धशतकेही झळकावली आहेत. या धावा करताना २५४ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘मला नाही वाटत रोहितला विश्रांतीची गरज आहे’, ‘हिटमॅन’च्या माजी संघसहकाऱ्याचे मोठे विधान

‘मी मुद्दाम सचिनला मारण्याच्या हेतूने धोकादायक गोलंदाजी करत होतो’, १६ वर्षांनंतर अख्तरचा मोठा खुलासा

न्यूझीलंडच्या फलंदाजाचा टी२० ब्लास्टमध्ये राडा! जबराट सिक्स मारताच चेंडूने गाठले बर्गरचे दुकान, VIDEO VIRAL

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---