न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात शनिवारपासून (२६ डिसेंबर) बे ओव्हल स्टेडियम येथे ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची सुरुवात झाली आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णयाचा आणि न्यूझीलंडला फलंदाजीचे आमंत्रण दिले. परंतु पहिल्या १० षटकांच्या आतच न्यूझीलंडचे दोन फलंदाज पव्हेलियनला परतले. त्यामुळे आता अनुभवी फलंदाज रॉस टेलर आणि कर्णधार केन विलियम्सन संघाचा डाव पुढे नेत आहेत. या सामन्यात टेलरने एक खास विक्रम केला आहे.
टेलरच्या नावावर खास विक्रमांची नोंद
पाकिस्तानविरुद्धचा हा ऐतिहासिक कसोटी सामना टेलरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ४३८ वा सामना आहे. यासह टेलर न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने आजवर १०४ कसोटी सामने, २३२ वनडे सामने आणि १०२ टी२० सामने असे मिळून एकूण ४३८ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत. यासह त्याने डेनियल विटोरीला मागे टाकले आहे.
टेलरनंतर न्यूझीलंडकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत डॅनियल वेटोरी याचा दुसरा क्रमांक लागतो. त्याने न्यूझीलंडकडून एकूण ४३७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर ब्रेंडन मॅक्यूलम ४३२ आंतरराष्ट्रीय सामन्यांसह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्यांच्याव्यतिरिक्त स्टिफन फ्लेमिंग आणि मार्टिन गप्टिल यांनीही न्यूझीलंडकडून ३००पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात १०० पेक्षा जास्त सामने खेळण्याचा विक्रमही या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या नावे नोंदवला आहे. विशेष म्हणजे, टेलरव्यतिरिक्त क्रिकेटजगतातील इतर कोणत्याही खेळाडूला हा किर्तिमान मिळवता आलेला नाही. अर्थातच वनडे, टी२० आणि कसोटीत प्रत्येकी १०० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळणारा तो जगातील पहिलाच क्रिकेटपटू आहे.
न्यूझीलंडकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे क्रिकेटपटू-
४३८ सामने- रॉस टेलर
४३७ सामने- डॅनियल वेटोरी
४३२ सामने- ब्रेंडन मॅक्यूलम
३९५ सामने- स्टिफन फ्लेमिंग
३२४ सामने- मार्टिन गप्टिल
महत्वाच्या बातम्या-
जड्डूची कमाल! मॅथ्यू वेडचा घेतला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ
IND vs AUS : भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यांची ‘सेंच्यूरी’