साउथम्पटन येथे सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील अखेरच्या दिवसाला सुरुवात झाली आहे. चौथा दिवस पूर्णपणे वाया गेल्यानंतर हा संपूर्ण दिवस तसेच, बुधवारी राखीव दिवशी सामना पूर्ण होऊन सामन्याचा निकाल लागावा अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. याच दरम्यान, न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी फलंदाज रॉस टेलर याने आपल्या डावाची सुरुवात करताना एका आद्वितिया विक्रमाला गवसणी घालत, जागतिक क्रिकेटमधील सर्व दिग्गज फलंदाजांच्या पंक्तित स्थान मिळवले.
अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता. पाचव्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हा १२ तर, रॉस टेलर ० धावांवर मैदानात उतरले. टेलरने आपली चौथी धाव काढताच एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. या चौथ्या धावेसह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८००० धावा करणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज बनला.
या दिग्गजांनी केली आहे अशी कामगिरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८००० धावा यापूर्वी केवळ १६ फलंदाजांनी केली आहे. यामध्ये भारताच्या सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली व विद्यमान कर्णधार विराट कोहली यांचा समावेश होतो. या यादीमध्ये श्रीलंका, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीजचे प्रत्येकी तीन फलंदाज आहेत.
श्रीलंकेसाठी सनथ जयसूर्या, माहेला जयवर्धने व कुमार संगकारा तसेच वेस्ट इंडिजसाठी ब्रायन लारा, शिवनारायण चंद्रपॉल व ख्रिस गेल यांनी ही विशेष कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स, जॅक कॅलिस व हाशिम आमला यांनीदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८००० धावांचा पल्ला गाठला होता.
ऑस्ट्रेलियाचे दोन माजी कर्णधार स्टीव वॉ आणि रिकी पॉंटिंग यांनीदेखील ही दैदिप्यमान कामगिरी केली आहे. पाकिस्तानसाठी केवळ इंजमाम उल हक ही कामगिरी करू शकला.
अशी राहिली टेलरची कारकीर्द
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी सर्वात अनुभवी फलंदाज असलेल्या रॉस टेलरने कारकिर्दीत आत्तापर्यंत १०८ कसोटी सामने खेळताना ७५१७, २३३ वनडे सामन्यात ८५८१ तर, १०२ टी२० सामन्यात १९०९ धावा जमविल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीनही प्रकारच्या क्रिकेटचे शंभर सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
WTC फायनल: पहिल्या षटकानंतर बुमराहला बदलावी लागली जर्सी, हे होते कारण
रोनाल्डोने कोको-कोलाच्या बॉटल हटवल्याच्या व्हिडिओवर करिना कपूरची ‘भन्नाट’ रिऍक्शन
स्टायलिश कॅप्टन कूल! पाहा धोनीच्या दहा हटके हेअरस्टाईल