ख्राईस्टचर्च। 29 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान हेगली ओव्हल स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताला 7 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात न्यूझीलंड संघ विजयाच्या समीप असताना भारताचा कर्णधार विराट कोहली गोलंदाजी करताना दिसून आला.
विराटच्या गोलंदाजीला न्यूझीलंड संघाचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने सामना संपल्यानंतर ट्रोल केले आहे.
या सामन्यात भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला दुसऱ्या डावात 7 धावांची गरज होती, त्यावेळी विराटने गोलंदाजी केली. विराटने न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात 35 व्या षटकात गोलंदाजी केली.
या षटकात विराट गोलंदाजी करत असताना हेन्री निकोल्स फलंदाजी करत होता. तर रॉस टेलर नॉन-स्ट्रायकर एन्डला होता. निकोल्सने विराटच्या पहिल्या तीन चेंडूवर एकही धाव काढली नाही. पण त्यानंतर विराटने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर बॅकवर्ड पाँइंट क्षेत्रात चेंडू फटकावत निकोल्सने चौकार मारला. पण त्यानंतर विराटने टाकलेल्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर निकोल्सला धावा काढता आल्या नाही.
Virat Kohli Bowling Vs NZ????#Kohli #ViratKohli #NZvsIND #INDvsNZTestCricket #INDvsNZ #indvsnz #Cricket pic.twitter.com/otPnIvJz1q
— Commonman (@santuwins) March 2, 2020
विराटच्या या गोलंदाजीबद्दल टेलरने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने विराट कोहलीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत विराट आणि टेलरबरोबर उमेश यादव आणि चेतेश्वर पुजारा देखील आहेत.
तसेच या फोटोला टेलरने कॅप्शन दिले आहे की ‘भारताचा न्यूझीलंड दौरा शानदार होता. कोणताही क्रिकेट प्रकार असो, भारतीय संघ नेहमीच एक कठिण प्रतिस्पर्धी आहे. मला आनंद आहे की मला विराट कोहलीच्या गोलंदाजीवर विजयी धाव काढावी लागली नाही.’
https://www.instagram.com/p/B9OAHZ7AdU6/
विराटने गोलंदाजी केलेल्या षटकानंतर 36 व्या षटकात न्यूझीलंडने 132 धावांचे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण करत सामना जिंकला. या सामन्यात विजय मिळवण्याबरोबरच न्यूझीलंडने 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0ने जिंकत भारताला व्हाईटवॉश दिला.
विराटने आत्तापर्यंत 11 कसोटी डावात गोलंदाजी केली आहे. त्याने या 11 डावांमध्ये 175 चेंडू टाकताना 84 धावा दिल्या आहेत. मात्र त्याला एकही विकेट घेतला आलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाचा टी२० वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये या संघाविरुद्ध होणार सामना
–या तीन मोठ्या खेळाडूंचे होऊ शकते टीम इंडियात पुनरागमन
–जेव्हा ट्रेंट बोल्ट चक्क कांद्यावर करतो स्वाक्षरी, पहा व्हिडिओ






