IPL 2024 Auction: आयपीएल 2024 लिलाव स्पर्धेचा लिलाव मंगळवारी (दि. 19 डिसेंबर) दुबईत सुरू झाला. या लिलावात विकला जाणारा पहिला खेळाडू वेस्ट इंडिजचा अष्टपैलू रोवमन पॉवेल ठरला. त्याला राजस्थान रॉयल्स संघाने कोट्यवधी रुपयांची बोली लावून आपल्या ताफ्यात घेतले.
रोवमन पॉवेल कोट्यवधी रुपयांत केकेआरच्या ताफ्यात
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royal) संघाने रोवमन पॉवेल (Rovman Powell) याला 7.40 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघाचा भाग बनवले. त्याची बेस प्राईज 1 कोटी रुपये होती.
रोवमन पॉवेलची आयपीएल कारकीर्द
रोवमन पॉवेल याला आयपीएलचा जास्त अनुभव नाहीये. त्याने फक्त 2 हंगाम खेळले आहेत. आयपीएल 2022मध्ये त्याने स्पर्धेत पदार्पण केले होते. तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. त्याने पहिल्या हंगामात 14 सामने खेळताना 250 धावा केल्या होत्या. या हंगामात त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. तसेच, आयपीएल 2023 हंगामात 3 सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त 7 धावा निघाल्या. तसेच, 1 विकेट घेण्यातही तो यशस्वी झाला. (Rovman Powell first player Sold to Rajasthan Royals for 7.40 crore in ipl 2024)
हेही वाचा-
IPL लिलावाच्या इतिहासातील Most Expensive Players, फक्त 7 नावे भारतीय; हंगामानुसार पाहा यादी
IPL 2024 New Rule: गोलंदाजांसाठी लागू होणार ‘हा’ मोठा नियम! फक्त ऐकूनच उडेल फलंदाजाचा थरकाप