एक असा क्रिकेटपटू ज्याच्या वडिलांची इच्छा नव्हती की त्याने जन्म घ्यावा. आईच्या गर्भात वाढत असतानाच वडीलांना त्याला जीवे मारायचे होते. गरिबी, वडिलांचा डोक्यावर हात नाही, अशी वेदनादायक कहाणी असणारा मुलगा आज वेस्ट इंडिजचा उभरता फलंदाज आहे. रोवमन पॉवेल असे या फलंदाजाचे नाव आहे. स्वत: पॉवेलने त्याच्या वैयक्तिक जिवनातील वेदनात्मक घटनांचा खुलासा केला आहे.
नोव्हेंबर २०१६मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रोवमन पॉवेलने गरिबीमध्ये आपले जिवन व्यतीत केले आहे. जमैकाच्या सेंट कॅथरीन येथे पॉवेलचा जन्म झाला. त्याच्या आईनेच त्याला लहानाचे मोठे केले. पॉवेलने कधीही त्याच्या वडिलांना पाहिले नाही. शिवाय, तो त्याच्या वडिल्यांच्या नातेवाईकांनाही कधी भेटला नाही.
पॉवेलच्या आईने एका मुलाखतीत सांगिले होते की, “त्यांच्या पतीने (पॉवेल वडील) पॉवेलला आईच्या गर्भात असतानाच मारण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी पॉवेलला जन्म द्यायचा निर्णय घेतला.”
पॉवेलला जेव्हा त्याच्या वडिलांविषयी विचारले गेले. त्यावेळी पॉवेल म्हणाला की, “मी कधीही त्यांना भेटलो नाही. पण मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी मला या जगात आणण्यासाठी त्यांचे शुक्राणू दिले. माझे लहानपण खूप कठीण परिस्थितीत गेले आहे. पण मी नेहमी देवावर विश्वास ठेवला. ज्या मुलांसोबत त्यांचे वडील आहेत मला त्यांना फक्त एवढेच म्हणायचे आहे की, माझ्याजवळ माझे वडील नसले म्हणून काय झालं. पण तुमच्याजवळ तुमचे दैवत आहे.”
वेस्ट इंडिजचा मधल्या फळीतील फलंदाज पॉवेलची तुलना त्याच्या संघातील आंद्रे रसलसोबत केली जाते. आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचे सीईओ मैसूर यांनी पॉवेलला ज्यूनिअर रसेल म्हणले होते. टी२० आणि टी१० लीगमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या पॉवेलला वनडे आणि टी२० या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रकारात चमकदार कामगिरी करता आली नाही.
त्याने आतापर्यंत वनडेत ३४ सामन्यात २३.९२च्या सरासरीने फक्त ६७० धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी२०मध्ये त्याने २६ सामन्यात २०.५०च्या सरासरीने फक्त ३२८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ अर्धशतकांचा समावेश आहे. असे असले तरी, २६ वर्षाच्या पॉवेलमध्ये खूप प्रतिभा आहे. त्याने स्वतवर काम केले तर तो भविष्यात एक दमदार फलंदाज म्हणून नावारुपाला येऊ शकतो.
ट्रेंडिंग घडामोडी-
दारुच्या नशेत असा करतात भांगडा! मनदीप सिंगचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
तेंडुलकरसमोर शतक करणाऱ्या ‘या’ खेळाडूने अवलंबला वाईट…
…म्हणून हरभजन सिंगने मागितली देशभरातील डॉक्टरांची माफी