सध्या महिला प्रीमियर (Women Premier League 2025) लीग सुरू आहे. त्यातील आजच्या (21 फेब्रुवारी) लढतीत स्म्रीती मानधनाच्या (Smriti Mandhana) नेतृत्वाखाली राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (MI) आमने-सामने आहेत. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 7 विकेट गमावून 167 धावा केल्या आहेत.
बंगळुरूमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा आरसीबीचा संघ फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा कर्णधार स्म्रीती मानधनाने विस्फोटक फॉर्म दाखवला. दरम्यान तिने 13 चेंडूत 26 धावा केल्या. तिच्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. एलिसे पेरी पुन्हा एकदा बंगळुरूसाठी तारणहार ठरली.
पेरीने झंझावाती अर्धशतक झळकावले. दरम्यान तिने 81 धावांची खेळी खेळली. तिच्या या शानदार खेळीमुळे बंगळुरूचा संघ 167 धावांपर्यंत पोहोचण्यास यशस्वी ठरला. आरसीबीने 57 धावांवर 4 विकेट गमावल्या आणि संघ 100 धावांपूर्वीच सर्वबाद होण्याच्या दिशेने वाटचाल करत होता. पण पेरीने रिचा घोषसोबत 50 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून बंगळुरूला सामन्यात परत आणले. दरम्यान रिचा घोषने पेरीला साथ देत 28 धावा केल्या.
बंगळुरूने शेवटच्या दोन्ही सामन्यात शानदार विजय मिळवला. या स्पर्धेत बंगळुरूने अद्याप पराभव पत्करला नाही. दुसरीकडे मुंबईने दोन सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. आता आरसीबीचा विजयी रथ रोखण्यात मुंबईचा संघ यशस्वी ठरतो का? हे पाहणंदेखील उत्सुकतेचं ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटप्रेमी सज्ज! चॅंपियन्स ट्रॉफीमध्ये होणार चुरशीची लढत
मोहम्मद शमीने उलगडले ‘फ्लाइंग किस’ सेलिब्रेशनचे रहस्य, रोहित शर्मा आणि गौतम गंभीरचा होता पाठिंबा
“विराट कोहली दबावात? पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी खळबळजनक विधान!”