ऑस्ट्रेलिया पुरूष क्रिकेट संघ भारताच्या (INDvsAUS) दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील पहिल्या टी20 सामन्यात यजमानांना दारूण पराभव पत्कारावा लागला. मोहाली, पंजाब येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांची चांंगलीच धुलाई केली. तर दौऱ्यातील दुसरा सामना नागपूर येथे शुक्रवारी (23 ऑक्टोबर) खेळला जाणार आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मोठ्या कालावधीनंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसण्याची शक्यता आहे. मात्र, भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग याने याबाबत एक गंभीर वक्तव्य केले.
आरपी सिंग हा दुसऱ्या सामन्यापूर्वी एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाशी बोलत होता. जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाविषयी विचारले असता तो म्हणाला,
“टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी फारसे काही शुभ संकेत नाहीत. जेव्हा आपण आशिया चषकामध्ये चांगली कामगिरी केली नाही तेव्हा वाटले की, आपल्याकडे हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह नाहीत म्हणून आपण हरलो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात हर्षल पटेल होता. मात्र, तरीही आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला. जसप्रीत बुमराहने पुनरागमन केल्यानंतर तो देखील धावा देण्याची शक्यता आहेच.”
तो पुढे म्हणाला, “आपले प्रमुख खेळाडू दुखापतीतून पुनरागमन करताच सामना जिंकून देतील अशी अपेक्षा करू नये. संघ व्यवस्थापनाला उपलब्ध खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरी करून घ्यावी लागेल. कारण, आपण सातत्याने सामने हरत आहोत. जसजसा विश्वचषक जवळ येत आहे तसतशी भारतीय संघाची कामगिरी घसरत चालली आहे.”
जसप्रीत बुमराह जुलै महिन्यातील इंग्लंड दौऱ्यानंतर कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळला नाही. दुखापतीनंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याने आपली तंदुरुस्ती सिद्ध करत, टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा बनवली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘याला काय अर्थ आहे, त्याला संधी दिली पाहिजे’, वाचा कुणाविषयी बोलला मॅथ्यू हेडन
एसए टी20 लिलावात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधारच राहिला ‘अनसोल्ड’! आता म्हणतोय…
रिषभ पंतने ‘या’ लहान चाहत्याचा दिवस बनवला खास! नागपूरात पोहोचताच केलय भारी काम