देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीला शनिवारी (12 नोव्हेंबर) भारतातील विविध शहरांमध्ये सुरुवात झाली. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये महाराष्ट्राने रेल्वेचा 7 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने झळकावलेले नाबाद शतक महाराष्ट्राच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. दुसरीकडे मुंबईने बंगालला 8 गडी राखून पराभूत करत शानदार सुरुवात केली.
Mumbai Won by 8 Wicket(s) #BENvMUM #VijayHazareTrophy Scorecard:https://t.co/clrLJrxvLl
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 12, 2022
विजय हजारे ट्रॉफी 2023 च्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राने एलिट ई गटातील आपला पहिला सामना रेल्वेविरुद्ध खेळला. रांची येथे झालेल्या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, रेल्वचे दोन्ही सलामीवीर शिवम चौधरी (46) व विवेक सिंग (32) यांनी 81 धावांची सलामी दिली. त्यानंतर महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. रेल्वेच्या जवळपास सर्वच फलंदाजांना चांगली सुरुवात मिळालेली. मात्र, कोणीही त्याचे रूपांतर मोठ्या खेळीत करू शकले नाही. कर्ण शर्माने 40 धावा केल्या. महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी त्यांचा डाव निर्धारित 50 षटकात 8 बाद 218 असा मर्यादित ठेवला.
Maharashtra Won by 7 Wicket(s) #MAHvRLW #VijayHazareTrophy Scorecard:https://t.co/0jXgbb5AEp
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 12, 2022
या धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्रासाठी कर्णधार ऋतुराज गायकवाड व अनुभवी राहुल त्रिपाठी यांनी सुरुवात केली. त्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा घेत अवघ्या 29.4 षटकात 165 धावा ठोकल्या. त्रिपाठी 75 धावा करून बाद झाल्यानंतर केदार जाधव व अझीम काझी हे अनुक्रमे एक व दोन धावा काढून माघारी परतले. मात्र, कर्णधार ऋतुराज गायकवाड याने एक बाजू लावून धरत नाबाद 124 धावांच्या खेळीसह संघाला विजय मिळवून दिला.
दुसरीकडे मुंबईने देखील बंगालला पराभूत करून स्पर्धेत विजयी सुरुवात केली. तनुष कोटीयान याने मिळवलेले चार बळी व त्याला इतर गोलंदाजांनी दिलेल्या साथीमुळे मुंबईने बंगालचा डाव केवळ 121 धावांवर संपुष्टात आणला होता. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार अजिंक्य रहाणेने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाने मुंबईने आठ गडी राखून विजय साजरा केला.
(Ruturaj Gaikwad Century Helps Maharashtra To Beat Railway In Vijay Hazare Trophy 2022-2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ए भावा! ते ‘प्लेअर ऑफ द मॅच’ कसं निवडतात? माहिती नसेल, तर एका क्लिकवर घ्या जाणून
हार्दिक पांड्याचा संघ न्यूझीलंडला रवाना; सूर्या, चहल आणि पंत एयरपोर्टच्या जमिनीवर झोपताना दिसले