भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी. या स्पर्धेच्या 2022च्या हंगामाच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले जात आहेत. यामध्ये सोमवारी (28 नोव्हेंबर) महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना खेळला गेला. ज्यामध्ये ऋतुराज गायकवाड याने द्विशतकी खेळी करत संघाला तीनशेच्या पार नेले.
या सामन्यात उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय एकट्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने चुकीचा ठरवला. त्याने 138.36च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. त्याने 159 चेंडूत नाबाद 220 धावा केल्या. यामध्ये 10 चौकार आणि 16 षटकांराचा समावेश आहे. त्याच्याशिवाय अंकित बावणे आणि अझिम काझी या दोघांनी प्रत्येकी 37-37 धावा केल्या. यामुळे महाराष्ट्राने 50 षटकात 5 विकेट्स गमावत 330 धावसंख्या उभारली.
ऋतुराजने पहिल्या 100 धावा 109 चेंडूत केल्या आणि नंतरच्या 120 धावा 50 चेंडूत केल्या. त्याने 2021पासून विजय हजारे ट्रॉफीच्या 8 डावांमध्ये 5 शतके आणि एक द्विशतक केले आहे. त्याने या स्पर्धेत 136 (112), 154* (143), 124 (129), 21 (18), 168 (132), 124* (123), 40 (42), 220* (159) अशा धावा केल्या आहेत.
6,6,6,6,6,6 by Ruturaj Gaikwad in the 49th over and he completed double hundred in the Quarter Final of Vijay Hazare. pic.twitter.com/cm1h2S1GFP
— Johns. (@CricCrazyJohns) November 28, 2022
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उत्तर प्रदेशकडून कार्तिक त्यागी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 10 षटकात 66 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर सर्वाधिक धावा शिवा सिंग याने दिल्या. त्याने 9 षटकात 88 धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेतली नाही. त्याचबरोबर या सामन्यात एक नो बॉलही त्यानेच टाकला.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बी ग्राऊंडवर हा सामना खेळला गेला. दुसरीकडे पंजाब विरुद्ध कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर विरुद्ध आसाम आणि सौराष्ट्र विरुद्ध तमिळनाडू हे उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू आहेत.
या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने 30 नोव्हेंबरला आणि अंतिम सामना 2 डिसेंबरला खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील ग्राउंड ए वर खेळला जाणार आहे. Ruturaj Gaikwad Double Century In Vijay Hazare Trophy 2022-23
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे विश्वचषक 2023साठी भारत, अफगाणिस्तानबरोबर ‘हे’ सहा संघ पात्र; दोन चॅम्पियन्स संघाना करावे लागणार श्रम
FIFA WC2022: मेस्सी, रोनाल्डोवर भारी पडला कॅनडाचा फुलबॉलपटू! नोंदवला ऐतिहासिक गोल, व्हिडिओ पाहाच