इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (IPL 2022) हंगाम सुरू होण्यास २६ मार्चपासून आयपीएलची सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सर्व आयपीएल फ्रँचायझींनी सरावाला सुरुवात केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके, CSK) फ्रँचायझीही सूरतमध्ये सराव करत आहे. परंतु त्यांचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) अद्याप सीएसकेच्या शिबिरात सहभागी झालेला नाही. यामागचे कारण त्याची दुखापत होता. तो दुखापतीमुळे बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनात होता. परंतु आता तो तंदुरुस्त झाला असून लवकरच सीएसकेच्या सराव शिबीरात सहभागी होणार असल्याचे समजत आहे.
६ मार्चपासून सूरतच्या लालभाई काँट्रॅक्टर स्टेडियमवर सीएसकेचे सराव शिबीर सुरू आहे. या सराव शिबिरात कर्णधार एमएस धोनी, रॉबिन उथप्पासहित बरेच खेळाडू सहभागी झाले आहेत. परंतु अद्याप ऋतुराज या शिबिरात सहभागी होऊ शकलेला नाही.
त्याला श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. याचमुळे तो संपूर्ण मालिकेतूनही बाहेर पडला होता. त्याला हाताच्या मनगटात वेदना जाणवल्या होत्या, त्यामुळे त्याला संघाबाहेर करत त्याच्याजागी मयंक अगरवालला संघात जागा देण्यात आली होती. मात्र आता तो फिट झाला असून त्याने फिटनेस चाचणीही पूर्ण केली आहे. तो लवकरच सीएसकेच्या सराव शिबीरातही सहभागी होण्याची शक्यता आहे.
सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी यासंदर्भात खरी माहिती दिली आहे. इनसाईडस्पोर्ट्शी बोलताना ते म्हणाले की, “ऋतुराज १७ किंवा १८ मार्चपर्यंत सूरतमध्ये सुरू असलेल्या शिबीरात सहभागी होऊ शकतो. मात्र अद्याप त्याने फिटनेस चाचणी पास केलेली नाही. कारण अजून त्याची ही चाचणी होणे बाकी आहे.”
Meeting in the Middle! 🦁 in Practice!
📹👉 https://t.co/jcD4NsNQ2t#WhistlePodu 💛 pic.twitter.com/QvrHYDiLi4— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 12, 2022
सूरतमध्ये कधीपर्यंत आहे सीएसकेचे सराव शिबीर
६ मार्च रोजी सुरू झालेले सीएसकेचे सराव शिबीर २२ मार्चपर्यंत चालू शकते. त्यानंतर सीएसकेचा संघ मुंबईला पोहोचेल. कारण आयपीएल २०२२ चा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार असून या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने सामने असतील.
चेन्नई सुपर किंग्ज संघ – रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, दीपक चाहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, ड्वेन ब्राव्हो, डेवॉन कॉनवे, शुभ्रांशू सेनापती, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महिश तिक्षणा, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, प्रशांत सोळंकी, सी हरी निशांत, एन जगदीसन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा, मुकेश चौधरी, सिमरनजीत सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
‘तुझा सार्थ अभिमान’; जसप्रीत बुमराहचा मायदेशात विकेट्सचा पहिला ‘पंचक’, पत्नीने केले रिऍक्ट
नाद करा पण आमचा कुठं! जसप्रीत बुमराहचा मायदेशात डंका; ५ विकेट्स घेत श्रीलंकन फलंदाज धाडलं तंबूत
आरसीबीच्या कर्णधारपदासाठी फाफ डू प्लेसिस का योग्य? फ्रँचायझीच्या डायरेक्टरनेच दिले स्पष्टीकरण