IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. ज्यासाठी इंग्लंडने आधीच आपला संघ जाहीर केला होता, तर आता भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. ज्यात मोहम्मद शमी बऱ्याच काळानंतर संघात परतला आहे. तर ध्रुव जुरेल आणि नितीश रेड्डी यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच वेळी, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करणारा ऋतुराज गायकवाडला स्थान मिळालेले नाही, ज्याचे त्याचे खराब फॉर्म हे एक प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. गायकवाडने 2024 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता आणि तेव्हापासून तो प्लेइंग 11 मधून बाहेर आहे
ऋतुराज गायकवाडबद्दल बोलायचे झाले तर, त्याने त्याच्या नेतृत्तवात आपल्या संघाला यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीच्या स्पर्धेत उपांत्य फेरीत नेले आहे. ज्यात त्याने चमकदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे, गायकवाडला या स्पर्धेत आतापर्यंत बॅटने कोणताही प्रभाव पाडता आलेला नाही. गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आतापर्यंत 6 डावात फलंदाजी केली आहे.ज्यातील फक्त एकाच डावात शतक झळकावण्यात यश आले आहे. याशिवाय, तो 5 डावांमध्ये 20 धावांचा टप्पाही ओलांडू शकला नाही. अशा परिस्थितीत, त्याच्या कामगिरीतील चढ-उतारांमुळे निवडकर्त्यांनी त्याला इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघात निवडले नाही. असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करणारा ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत 23 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 20 डावांमध्ये फलंदाजी करताना 39.56 च्या सरासरीने 633 धावा केल्या आहे. ज्यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. जर आपण टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात गायकवाडचा स्ट्राईक रेट पाहिला तर तो 143.54 आहे जो सलामीवीर फलंदाज म्हणून खूप चांगला मानला जाऊ शकतो. आता गायकवाडला संघात परतण्यासाठी बराच काळ वाट पहावी लागेल.
हेही वाचा-
IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत या खेळाडूकडे उपकर्णधारपद, हार्दिककडे पुन्हा दुर्लक्ष
14 महिन्यांनतर मोहम्मद शमीचे पुनरागमन! नाही खेळणार सर्व सामने? मोठे अपडेट समोर
दिनेश कार्तिकने रचला इतिहास, SA20 लीग खेळणारा ठरला पहिलाच भारतीय