आयपीएल २०२१ स्पर्धेत सोमवारी (४ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळली. या सामन्यात दिल्लीने विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर कूच केली. दरम्यान, गेल्या सामन्यातील चेन्नई सुपर किंग्स संघाचा शतकवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय. राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ६० चेंडूंमध्ये ९ चौकार आणि ५ षटकारांचा साहाय्याने १०१ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळी नंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याचे कौतुक केले देखील केले होते.
परंतु, आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो एका लहान मुलासोबत मस्ती करताना दिसून येत आहे. हा बेबी बॉय दुसरा तिसरा कोणी नसून सुरेश रैनाचा दीडवर्षीय मुलगा रियो रैना आहे. मैदानावर आक्रमक असणाऱ्या ऋतुराजचा हा गोड अंदाज चाहत्यांच्या पसंतीचा ठरतोय. या फोटोवर कॅप्शन म्हणून “कन्ना मूची रु” असे लिहिले आहे.(Ruturaj Gaikwad playing with suresh raina,s video, watch video)
Kanna Moochi Ru Rio ????????#PeekABoo #WhistlePodu #Yellove ???????? @Ruutu1331 pic.twitter.com/lXzkhwTRhH
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 3, 2021
ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघासाठी आतापर्यंत एकूण १३ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४७.३६ च्या सरासरीने ५२१ धावा केल्या आहेत. यामध्ये १ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १९ सामन्यात एकूण ७२५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटीमध्ये २४ वर्षीय रिषभ पंतच्या नावे आहे ३ मोठ्या विक्रमांची नोंद, धोनीलाही टाकलंय मागे
अवघड झालंय! टी२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला सतावत आहे ‘या’ ५ गोष्टींची चिंता






