---Advertisement---

‘चेन्नईचा चॅम्पियन’ ऋतुराज पोहोचला मुंबईत! संघाच्या आनंदाला उरला नाही पारावर

On: बुधवार, मार्च 16, 2022 9:12 PM
ruturaj reach csk
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम (आयपीएल २०२२) सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. सर्व खेळाडू हळूहळू आपापल्या कॅम्पमध्ये जमा होऊ लागलेत. आपले विजेतेपद राखण्यासाठी गतविजेता चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ सज्ज झाला आहे. त्यांनी सर्वप्रथम सुरत येथे मोठा ट्रेनिंग कॅम्प आयोजित केला. आता आयपीएलसाठी चेन्नई संघ मुंबई येथे दाखल होत आहे. संघाचा युवा सलामीवीर व मागील हंगामात सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप पटकावणारा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हादेखील बुधवारी (१६ मार्च) मुंबईत दाखल झाला.

 

ऋतुराजचे मुंबईत आगमन

मागील दोन हंगामात आपल्या बॅटने आयपीएल गाजवणाऱ्या ऋतुराज गायकवाडचे नुकतेच मुंबई येथे आगमन झाले. चेन्नई सुपर किंग्सने त्याच्या आगमनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओ लक्ष देत त्यांनी लिहिले,

‘जेव्हा तो येतो तेव्हा आनंदाला पारावर राहत नाही.’

https://twitter.com/ChennaiIPL/status/1504095343470084096?t=5JCQatfcw-SkLof5ofgxzw&s=19

ऋतुराज बंगलोर येथून मुंबईला पोहोचला आहे. बीसीसीआयने २५ भारतीय खेळाडूंना नुकतेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे फिटनेस टेस्टसाठी बोलावले होते. ऋतुराज मागील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेत दुखापतग्रस्त झाला होता. त्याची मनगटाची दुखापत आता बरी झाल्याचे वृत्त देण्यात आले होते.

मागील वर्षी गाजवली आयपीएल

ऋतुराज गायकवाडने २०२० आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर अखेरच्या तीन सामन्यांमध्ये सलग तीन अर्धशतके ठोकत त्याने सर्वांची मने जिंकली. त्यानंतर आयपीएल २०२१ मध्ये त्याने स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवत ऑरेंज कॅप पटकावली. आयपीएल २०२२ साठी रवींद्र जडेजा, कर्णधार एमएस धोनी व मोईन अली यांच्यासह त्याला संघ व्यवस्थापनाने रिटेन केले. चेन्नईला विजेतेपद राखायचे असल्यास पुन्हा एकदा ऋतुराजला मागील वर्षीचा कारनामा करून दाखवावा लागेल.

महत्वाच्या बातम्या-

बाबो! रणजी ट्रॉफीत झारखंडची असाधारण कामगिरी, नागालँडवर तब्बल १००८ धावांची आघाडी; सामना मात्र.. 

लो जी हम आ गए! ‘यलो आर्मी’सोबत जोडला गेला जडेजा, सीएसकेने शेअर केला आगमनाचा Video

व्वा! मागे धावत हरमनप्रीतचा शानदार ‘हवाई’ झेल, कोलांट्या खाल्यानंतरही सोडला नाही चेंडू- Video 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---