इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी काही खास नव्हती. तीन वेळच्या आयपीएल विजेता संघ चेन्नईला यंदा सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे त्यांच्यासाठी हा हंगाम निराशाजनक ठरला. पण असे असले तरी युवा खेळाडूंची कामगिरी ही या संघासाठी सकारात्मक बाजू ठरली. त्यांच्यासंघाकडून काही युवा खेळाडूंनी अनेकांना प्रभावित केले. त्यातीलच एक खेळाडू म्हणजे ऋतुराज गायकवाड.
ऋतुराजची आयपीएलमधील सुरुवात काही खास राहिली नाही. तो चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पणच्या सामन्यात खेळताना शुन्यावर बाद झाला. त्यानंतरच्या 2 सामन्यातही तो अनुक्रमे 5 आणि शून्य धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर त्याने जबरदस्त पुनरागमन करत चेन्नईकडून शेवटच्या तिन्ही सामन्यात अर्धशतके ठोकली. यामागे धोनीचा सल्ला उपयोगी आला, असा खुलासा नुकताच ऋतुकराजने केला आहे.
ऋतुराजने स्पोर्ट्सस्टारला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की धोनीने त्याच्याशी संवाद साधला होता आणि त्यानंतर त्याच्यावरील दबाव कमी झाला.
ऋतुराज म्हणाला, ‘ ‘मला माहित आहे की मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणे माझ्यासाठी आव्हान असेल. मला बोल्ट, बुमराह आणि पॅटीनसनसारख्या गोलंदाजांना सामोरे जावे लागणार होते. पण मी जसा बाद झालो, त्यानंतर आम्ही सावरुच शकलो नाही. आम्ही केवळ 110 च्या आसपास धावा करु शकलो.’
तो पुढे म्हणाला, ‘मी नवीन चेंडूवर बाद झाल्याने आणि संघाला चांगली सुरुवात देऊ न शकल्याने स्वत:लाच दोष देत होतो. ज्याचा परिणाम मैदानात होत होता. माझ्याकडून क्षेत्ररक्षण खराब होत होते. माझा आत्मविश्वास ढळत होता.’
त्यानंतर धोनीने दिलेल्या सल्ल्याचा कसा उपयोग झाला याबद्दल सांगताना ऋतुराज म्हणाला, ‘धोनीने मला सांगितले की आम्हाला तुझ्यावर दबाव आणायचा नाही, पण संघाला तुझ्याकडून अपेक्षा आहेत. मला फक्त एवढेच सांगायचे आहे की तू धावा केल्या की नाही तो प्रश्न नाही, पण तू पुढील तीनही सामने खेळणार आहेस. फक्त त्या खेळाचा आनंद घे जास्त विचार करू नकोस.”
ऋतुराज म्हणाला की, ‘धोनीने मला खेळाचा आनंद लुटण्याचा सल्ला दिला. त्या संवादानंतर माझी विचार प्रक्रियाच बदलली. तोपर्यंत मी फक्त याचाच विचार करत होतो की मी आयपीएलमध्ये पहिला चौकार कधी मारेल. मी माझी छाप कधी पाडेल. मला 15-20 धावा तरी कधी करता येतील. पण त्या संवादानंतक मोठा बदल झाला. मला आठवते रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध मी केवळ माझ्या संघासाठी योग्य योगदान देण्याचा विचार करत होतो. कदाचीत कर्णधाराने माझे मन जाणले होते आणि माझी विचार प्रक्रिया बदलली होती. त्यामुळे मी खुलेपणाने खेळू शकलो.’
ऋतुराजने बेंगलोरविरुद्ध नाबाद 65, कोलकाताविरुद्ध 72 आणि किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध 62 धावांची खेळी केली. त्याने 6 सामन्यात 51 च्या सरासरीने 204 धावा केल्या.
महत्त्वाच्या बाचम्या –
हृदयविकाराच्या झटक्यानंतर कपिल देव पुन्हा गोल्फ कोर्सवर, पाहा व्हिडिओ
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल, खेळाडूंना विशेष सुविधा, विराट कोहलीसाठी खास पेंटहाउस
ट्रेंडिंग लेख –
…आणि हिटमॅन रोहित शर्मा झाला ‘स्टार क्रिकेटर’
…तेव्हा एमएस धोनीने केलेली ‘ती’ भविष्यवाणी रोहित शर्माने खरी करून दाखवली!