मंगळवारी (दि. 23 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने धमाकेदार कामगिरी करत 15 धावांनी विजय मिळवला. यासह त्यांनी दहाव्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्याचा मान पटकावला. चेन्नईच्या विजयात युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांची मोठी भूमिका राहिली. त्याला त्याच्या अर्धशतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना त्याने एक मोठी गोष्ट म्हटली.
थेट अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या चेन्नईला ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांनी पुन्हा एकदा दमदार सलामी दिली. ऋतुराजने गुजरातविरुद्धचा आपला आतापर्यंतचा फॉर्म कायम राखत 44 चेंडूवर 7 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 60 धावा केल्या. त्याबरोबरच विजय शंकरचा एक अप्रतिम झेल टिपत त्याने सामन्याला कलाटणी दिली. त्याच्या या खेळीमुळे चेन्नई मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरली. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर बोलताना तो म्हणाला,
“संघाच्या विजयात योगदान देऊन नक्कीच आनंद होतो. मला या संघासाठी तशीच कामगिरी करायचे आहे जी सुरेश रैना अनेक वर्ष करत आला होता.”
सुरेश रैना चेन्नईच्या आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. तसेच प्ले ऑफमध्ये त्याची कामगिरी नेहमी दमदार राहिली होती. ऋतुराजने आतापर्यंत तीन प्ले ऑफ सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात तो सामनावीर ठरला आहे. दुसरीकडे रैना हा आयपीएल इतिहासातील एकमेव क्रिकेटपटू आहे जो एलिमिनेटर, क्वालिफायर व अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेला.
(Ruturaj Gaikwad Said I Want Do That What Suresh Raina Did For CSK)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘खरा मित्र सुखासोबतच दुःखातही…’, सिडनीतील सभेत नरेंद्र मोदींनी काढली शेन वॉर्नची आठवण
पहिल्या Qualifierमध्ये चमकली ऋतुराज-कॉनवेची जोडी, 87 धावांच्या भागीदारीने घडवला इतिहास, वाचाच