---Advertisement---

चेन्नईच्या ऋतुराजचा मोठा विक्रम! रोहित, गंभीरचा विक्रम मोडत ‘त्या’ यादीत पटकावला पहिला क्रमांक

On: शुक्रवार, ऑक्टोबर 1, 2021 2:13 AM
---Advertisement---

शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४४ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात चेन्नईने ६ विकेट्सने विजय मिळवत प्ले ऑफमधील स्थान पक्के केले. चेन्नईच्या या विजयात युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने महत्त्वाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याच्या नावावर एक मोठा विक्रम झाला आहे.

ऋतुराजचा मोठा विक्रम
हैदराबादने चेन्नईला विजयासाठी १३५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसने चेन्नईला दमदार सुरुवात करुन दिली होती. या दोघांनी ७५ धावांची सलामी भागीदारी केली. पण, दोघेही अर्धशतकाच्या जवळ असताना बाद झाले. ऋतुराजने ४५ धावा केल्या, तर फाफ डू प्लेसिसने ४१ धावा केल्या.

दरम्यान ऋतुराजच्या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १७ सामन्यांत ६ अर्धशतकांसह ४३.६४ च्या सरासरीने ६११ धावा झाल्या आहेत. त्यामुळे तो आयपीएल कारकिर्दीत पहिल्या १७ डावांनंतर सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने रोहित शर्मा आणि गौतम गंभीरला मागे टाकले आहे. रोहितने १७ डावांनंतर आयपीएलमध्ये ५६५ धावा केल्या होत्या. तर गंभीरने ५३० धावा केल्या होत्या.

तरी, आयपीएलमध्ये पहिल्या १७ डावांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या एकूण फलंदाजांमध्ये मॅथ्यू हेडन अव्वल क्रमांकावर आहे. तर, ऋतुराज ६ व्या क्रमांकावर आहे. हेडनने १७ डावांनंतर ७७८ धावा केल्या होत्या. या यादीत पहिल्या ५ क्रमांकावर परदेशी खेळाडू आहेत.

आयपीएलमध्ये पहिल्या १७ डावांनंतर सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटर
७७८ – मॅथ्यू हेडन
७७६ – शॉन मार्श
७३९ – लेंडल सिमन्स
७०२ – जॉनी बेअरस्टो
६३० – मायकल हसी
६११ – ऋतुराज गायकवाड

चेन्नईचा विजय 
हैदराबादने दिलेल्या १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऋतुराज आणि डू प्लेसिस व्यतिरिक्त मोईन अलीने १७ धावांची खेळी केली. तर अखेर अंबाती रायडू आणि एमएस धोनी यांनी आक्रमक छोटेखानी नाबाद खेळी केल्या. रायडूने १७ आणि धोनीने १४ धावा केल्या. त्यामुळे चेन्नईने १९.४ षटकात ४ विकेट्स गमावत १३९ धावा करत सामना जिंकला. हैदराबादकडून या सामन्यात जेसन होल्डरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर, राशिद खानने १ विकेट घेतली.

तत्पूर्वी हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १३४ धावा केल्या होत्या. हैदराबादकडून वृद्धिमान साहाने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. याशिवाय एकालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. चेन्नईकडून जोश हेजलवूडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर, ड्वेन ब्रावोने २ विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! ख्रिस गेलने ‘या’ कारणामुळे सोडले बायो-बबल, उर्वरित आयपीएलमधूनही बाहेर

धोनीचा विजयी षटकार अन् लाडकी लेक झिवाचा जल्लोष, व्हिडिओ होतोय व्हायरल

“कधी मलाही चहाला बोलव”; भज्जीने केले रोहितला ट्रोल; मजेदार आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---