भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड शनिवारी (03 जून) लग्नबंधनात अडकला. ऋतुराजने आपली प्रेयसी उत्कर्षा पवार हिच्याशी आयुष्यातील नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. ऋतुराजने नुकतीच चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर दुसरीकडे त्याची पत्नी उत्कर्षा देखील क्रिकेटपटूच आहे. दोघांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून लग्नातील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
ऋतुराज आणि उत्कर्षाच्या लग्नातील सुंदर फोटो –
https://www.instagram.com/p/CtCTBDZt1oH/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
दोघांनी आपल्या अधिकत सोशल मीडिया खात्यावरून लग्नातील हे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांची प्रतिक्षा संपली. दरम्यान, चाहत्यांना आधीपासूनच माहिती होते की, ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) आणि उत्कर्षा पवार (Utkarsha Pawar) शनिवारी लग्न करणार आहेत. कारण भारतीय सलामीवीर फलंदाजाने लग्नाचे कारण देत संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाणे टाळले होते.
ऋतुराज आणि उत्कर्षा मागच्या मोठ्या काळापासून रिलेशनमध्ये होते. अखेर शनिवारी त्यांच्या प्रेमाला लग्नाची जोड मिळाली आहे. ऋतुराजप्रमाणेच त्याची पत्नीही देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाची खेळाडू राहिली आहे. दोन भारतीय क्रिकेटपटूंमध्ये प्रेम आणि नंतर लग्न होण्याची ही शक्यतो पहिलीच वेळ आहे.
भारतीय संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभय संघांतील हा सामना 7 ते 11 जूनदरम्यान इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी ऋतुराज गायकवाडला राखीव खेळाडूंमध्ये निवडले गेले होते. मात्र, लग्नाचे कारण देत त्याने या दौऱ्यातून माघार घेतली. त्याच्या जागी यशस्वी जयस्वालला निवडकर्त्यांनी इंग्लंडला बोलावून घेतले. ऋतुराज या दौऱ्यासाठी राखीव खेळाडूंमध्ये निवडला गेला होता, पण ऐन वेळी त्याला भारताकडून आपला पहिला कसोटी सामना खेळण्याची संधीही मिळू शकत होती. डब्ल्यूटीसीच्या या अंतिम सामन्यात भारतीय संघापुढे बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान आहे. (Ruturaj Gaikwad ties the knot with Utkarsha Pawar.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
लेकासाठी धाऊन येणार बाप! क्रिकेटच्या देवाचे अर्जुनच्या भविष्यावर मोठे भाष्य; म्हणाला, ‘त्याला वेळ द्या’
‘खिलाडी निकले हिरे की खान से’, प्रीमिअर हँडबॉल लीगसाठी महाराष्ट्र आयर्नमेनचे संघगीत लाँच