दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला अंडर19 विश्वचषक स्पर्धेत रवांडाने मंगळवारी झिम्बाब्वेला पराभूत करत उलटफेर केला. रवांडाच्या या विजयात त्याची गोलंदाज हेन्रिएट इशिम्वेचे मोठे योगदान राहिले. तिने या सामन्यात हॅट्रिक घेतली आहे. विशेष म्हणजे तिने सलग चार चेंडूवर चार बळी मिळवत श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाच्या विक्रमाची बरोबरी केली. याआधी सोमवारी (16 जानेवारी) दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मॅडिसन लँडसमॅनने हॅट्रिक घेतली होती.
लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वे संघाला 18.4 षटकांत केवळ 80 धावाच करता आल्या. 19 वे षटक टाकणाऱ्या हेन्रिएटने या षटकातील सलग चार चेंडूंत चार बळी घेतले. तीने पहिल्याच चेंडूवर कुडजाई चिगोराला खाते न उघडता त्रिफळाचित केले. पुढच्याच चेंडूवर ओलेंडर चारेला पायचित झाली. यानंतर चिपो मोयो तिसऱ्या चेंडूवर बाद झाली. चौथ्या चेंडूवर नदलाम्बीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत तिने झिम्बाब्वेचा डाव संपुष्टात आणला.
History is made at the #U19T20WorldCup 🙌
🔹 Rwanda’s World Cup first
🔹 England and Kiwis roll on
🔹 James inspires West Indies againMore on an action-packed Day 4 ⬇️https://t.co/gzSTWwobxS
— ICC (@ICC) January 17, 2023
यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा लसिथ मलिंगा व आयर्लंडचा कर्टिस कॅम्फर यांनी अशी कामगिरी करून दाखवलेली. मलिंगा याने 2007 वनडे विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार चेंडूवर चार बळी मिळवलेले. तसेच, 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातही त्याने हा कारनामा केलेला. तर, कॅम्फरने 2021 टी20 विश्वचषकात नेदरलँड्सविरूद्ध हॅट्रिकसह 4 बळी टिपलेले.
(Rwanda Bowler Henriette Ishimwe Took 4 Balls 4 Wickets In Womens U19 T20 World Cup Equal Lasith Malinga)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथचे वादळी शतक, विक्रम मोडणे विराट कोहलीसाठीही अशक्य
टीम इंडियाच्या माजी कर्णधारावर गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्याशी संबंध