---Advertisement---

काल सोडली टीम इंडिया, आज मिळाला नवा जॉब! असिस्टंट कोचचे नशीब उजळले; KKR कडून ऑफर

On: बुधवार, जुलै 29, 2026 12:31 PM
---Advertisement---

रायन टेन डोशेट यांनी काल (मंगळवार, 28 जुलै) भारताच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाचा अधिकृतपणे राजीनामा दिला. आता त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना एक मोठी जबाबदारी मिळाली आहे. ते कोलकाता नाईट रायडर्स (KKR) परिवारामध्ये पुन्हा सामील झाले आहेत.

नाईट रायडर्सने त्यांना क्रिकेट रणनीती प्रमुख (हेड ऑफ क्रिकेट स्ट्रॅटेजी) म्हणून नियुक्त केली आहे. आयपीएल व्यतिरिक्त ते नाईट रायडर्सच्या इतर संघांसोबतही काम करणार आहेत. भारतीय संघ सोडल्यानंतर अवघ्या एका दिवसांतच त्यांना ही नवी जबाबदारी मिळाली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या निवेदनात म्हटले की, रायन संपूर्ण नाइट रायडर्स नेटवर्कमध्ये खेळाडू शोधणे, खेळाडूंची भरती, संघ नियोजन आणि कामगिरी मूल्यांकनासाठी धोरणात्मक दिशा देईल. ते सर्व नाइट रायडर्स फ्रँचायझींमध्ये एक सुसंगत क्रिकेट तत्त्वज्ञान आणि दृष्टिकोन तयार करण्यासाठी प्रशिक्षण संघांसोबत मिळून काम करेल. आपल्या भूमिकेचा एक भाग म्हणून, ते CPL मध्ये ट्रिनबागो नाइट रायडर्स, ILT20 मध्ये अबू धाबी नाइट रायडर्स आणि MLC मध्ये लॉस एंजेलिस नाइट रायडर्ससाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही काम पाहील.

नाईट रायडर्स स्पोर्ट्सचे सीईओ वेंकी म्हैसूर म्हणाले, “टेंडोचे (रायन टेन डोशेट) नाईट रायडर्स परिवारात पुन्हा स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या तत्त्वज्ञानाची त्यांची सखोल जाण, तसेच फ्रँचायझी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांचा अनुभव, त्यांना या भूमिकेसाठी अत्यंत योग्य बनवतो. ते नाईट रायडर्सच्या विकासाच्या पुढील टप्प्याला आकार देण्यास मदत करतील.”

केकेआरमध्ये रायन कोणत्या भुमिकेत असणार, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

आपल्या नियुक्तीबाबत रायन म्हणाले, “या भूमिकेत नाइट रायडर्ससोबत परत आल्याचा मला आनंद आहे. आमच्या जागतिक फ्रँचायझींमधील कोचिंग आणि ऍनालिटिक्स टीम्ससोबत काम करून आमची स्काउटिंग/खेळाडू विकास प्रणाली अधिक मजबूत करण्याची आणि एक दीर्घकालीन क्रिकेट धोरण तयार करण्याची ही एक अनोखी संधी आहे.”

रायन नाईट रायडर्ससोबत 2011 मध्ये केकेआरसाठी खेळाडू जोडले गेले. ते आयपीएल 2012 आणि 2014 च्या विजेत्या संघांचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यानंतर ते 2022 मध्ये आणि 2024 मध्ये संघाच्या तिसऱ्या आयपीएल विजेतेपदाच्या वेळी प्रशिक्षक गटाचा एक महत्त्वाचा भाग बनले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---