इंडियन प्रीमियर लीग २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात अडकलेला भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. तो केरळ क्रिकेट असोसिएशनद्वारे आयोजित प्रेसिडेंट टी२० स्पर्धेत भाग घेणार आहे. तरीही या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. केरळ क्रिकेट असोसिएशन या स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रशासनाकडून मंजूरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.
स्पोर्ट्सस्टारने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीसंत अलाप्पुझामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या केरळ प्रेसिडेंट टी२० स्पर्धेत खेळेल. अनेक राज्य क्रिकेट संघ आपल्या टी२० लीगचे आयोजन करत आहेत. आणि केरळ क्रिकेट असोसिएशन त्या यादीत सामील होणारा नवीन क्रिकेट बोर्ड आहे.
स्पोर्ट्सस्टारशी बोलताना केरळ क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांनी श्रीसंतच्या या स्पर्धेत खेळण्याची पुष्टी केली आहे. त्यांनी म्हटले की, तो या स्पर्धेतील मुख्य आकर्षणाचा भाग असेल.
ते म्हणाले, “हो नक्कीच. श्रीसंत स्पर्धेतील आकर्षण असेल. प्रत्येक खेळाडू एकाच हॉटेलमधील जैव- सुरक्षित वातावरणात राहतील. आम्ही या स्पर्धेचे आयोजन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात करण्याची योजना करत आहोत. केरळ प्रशासनाकडून मंजूरी मिळाल्यानंतर या स्पर्धेच्या तयारीला लागणार आहोत.”
श्रीसंतवर २०१३ मध्ये लागलेली ७ वर्षांची बंदी सप्टेंबरमध्ये संपली आहे. त्याने २००७ मध्ये टी२० विश्वचषक आणि २०११ च्या वनडे विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
भारतीय संघाकडून त्याने आतापर्यंत २७ कसोटी सामने, ५३ वनडे सामने आणि १० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ८७ विकेट्स, वनडेत ७५ विकेट्स आणि टी२०त ७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यावरील बंदी हटल्यामुळे तो आयपीएलमध्येही पुनरागमन करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीसंतने मिसबाहचा झेल पकडला आणि….
एस श्रीसंत लागला क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीला; शेअर केले व्हिडिओ
‘आयपीएल दरम्यान श्रीसंतच्या खोलीत रहायच्या मुली, यायचे २ ते ३ लाख रुपयांचे बिल!’