---Advertisement---

पुजारा-रहाणेचा पुन्हा एकदा ‘फ्लॉप शो’! भारतीय दिग्गज म्हणतोय, “दुसरा डाव…”

On: मंगळवार, जानेवारी 4, 2022 1:30 AM
ajinkya-pujara
---Advertisement---

अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) आणि चेतेश्वर पुजारा (cheteshwar pujara) भारताच्या कसोटी संघाचे महत्वाचे खेळाडू मानले जात होते. परंतु आता परिस्थिती बदललेली दिसते. मागच्या दोन वर्षापासून यांचे प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. असे असले तरी दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांना सामील केले गेले. मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्यातही दोघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान बनवले. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा हे दोन्ही अनुभवी फलंदाज अपयशी ठरले. अशात माजी दिग्गज सुनील गावसकर (sunil gavaskar) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना सोमवारी (३ जानेवारी) जोहान्सबर्गमध्ये खेळला जात आहे. चेतेश्वर पुजारा दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात अवघ्या ३ धावा करून तंबूत परतला. तर, त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेने पहिल्याच चेंडूवर विकेट गमावली. दक्षिण अफ्रिकेच्या ऑलिव्हियरने या दोन्ही दिग्गजांना स्वस्तात बाद केले. पुजारा आणि रहाणेच्या खराब प्रदर्शनानंतर माजी कर्णधार आणि भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. गावसकरांच्या मते, या दोघांच्या ऐवजी फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांना संधी मिळाली पाहिजे.

काय म्हणाले सुनील गावसकर

समालोचन करताना सुनील गावसकर म्हणाले की, “या दोन विकेट्सनंतर असे म्हणू शकतो की, पुढचा डाव पुजार-रहाणेसाठी कसोटी कारकीर्द वाचवण्याची शेवटची संधी असेल. दोघांच्या कसोटी संघातील जागेवर आधीच प्रश्नचिन्ह होते. आता या फ्लॉप शोनंतर असे वाटते की, त्यांच्याकडे शेवटची संधी राहिली आहे.”

दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ १-० अशा आघाडीवर आहे. उभय संघातील दुसऱ्या सामन्यात, जर भारताने विजय मिळवला, तर संघ विजयी आघाडी घेईल. दुसऱ्या सामन्यातून कर्णधार विराट कोहलीने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. केएल राहुल संघाचे नेतृत्व करत आहे.

दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने काही खास प्रदर्शन केले नाही. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने सर्वबाद २०२ धावा केल्या. यामध्ये कर्णधार केएल राहुलने (५०) अर्धशतकी खेळी केली.

महत्वाच्या बातम्या –

…आणि ऑलिव्हियरने केली गावसकरांची बोलती बंद! काय घडले कसोटीच्या पहिल्या दिवशी? वाचा सविस्तर

निलंबन ते टीम इंडियाचा कर्णधार; तीन वर्षांत उजळले राहुलचे भाग्य

द्रविडने जागवल्या जोहान्सबर्गमधील पहिल्या शतकाच्या आठवणी; ‘त्या’ साथीदाराचे केले कौतुक

व्हिडिओ पाहा –

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---