---Advertisement---

पंतवर टीकेचा भडिमार सुरूच! गावसकर, मदललाल यांच्यानंतर ‘हा’ दिग्गज संतापला

On: रविवार, जानेवारी 9, 2022 11:23 PM
rishabh-pant
---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (rishabh pant) सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्ग कसोटीत पंतने विरोधी संघातील खेळाडूसोबत वाद घातला होता आणि आवश्यकता नसताना पुढे येत मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला होता. त्यानंतर अनेकांनी पंतच्या खेळावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता भारताचे माजी अष्टपैलू रितेंदर सोढी (ritender sodhi) यांनीही पंतवर निशाणा साधला आहे. त्यांच्यामते पंतला पुढच्या सामन्यात संघातून बाहेर ठेवले, तर यात काहीच चुकीचे नसेल.

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला गरज असताना पंत चुकीचा फटका खेळून बाद झाल्यामुळे चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली. पंत कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर पुढे जाऊन मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, चेंडू त्याच्या बॅटला लागून यष्टीरक्षकाच्या हातात गेला. पंत बाद होण्यापूर्वी भारताने अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोन महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. अशात पंतकडून टिकून खेळण्याची अपेक्षा होती. परंतु, त्याने सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फेरले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सोढी म्हणाले की, “आमच्या वेळी संघाला गरज असताना जर तुम्ही खराब फटका खेळला आणि तुमच्या संघाला त्यामुळे नुकसाना झाले, तर शिक्षा देण्यासाठी पुढच्या सामन्यातून बाहेर केले जायचे. मात्र, आता तसे नाहीये. रिषभ पंत तुमचा सुपरस्टार आहे. पण, मोठ्या खेळाडूने चूक करो किंवा लहान, चूक ही चूक असते. रिषभ पंतसोबत खूप चर्चा केली गेली आहे. जर त्याला अद्दल घडवण्यासाठी पुढच्या सामन्यातून बाहेर केले गेले, तर ही मोठी गोष्ट नसेल. कारण, अशा चुका सतत होत आहेत.”

दरम्यान, पंत मागच्या काही काळापासून वारंवार चुका करत आहे आणि मोठी खेळी करून शकलेला नाही. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यात देखील तो अपयशी ठरला. त्याच्या या खराब प्रदर्शनासाठी सोढींच्या आधी माजी कर्णधार सुनील गावसकर आणि माजी वेगवान गोलंदाज मदन लाल यांनी पंतला खडेबोल सुनावले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बेंगलोरचा धडाका रोखत यूपीचा दणदणीत विजय; श्रीकांत जाधवची अष्टपैलू कामगिरी

पुणेरी पलटण विजयी मार्गावर! युवा अस्लम इनामदारची धडाकेबाज कामगिरी

रोहित आणि मुंबई इंडियन्सचे नाते झाले ११ वर्षांचे; फ्रॅंचाईजीने शेअर केली ‘खास’ पोस्ट

व्हिडिओ पाहा –

सचिनच्या सल्ल्याने पालटली कारकीर्द पण सचिनमुळेच जगभर ट्रोल झालेला Lord Thakur |  Sachin Tendulkar

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---