---Advertisement---

पाकिस्तानची पराभवांची मालिका सुरूच, टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिका बनला तिसरा संघ

On: शनिवार, डिसेंबर 14, 2024 9:45 AM
---Advertisement---

सध्या पाकिस्तान क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेचा दाैरा करत आहे. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली संघ पहिल्या सत्रात तीन टी20 सामने खेळत आहे. ज्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा पारडं जड आहे. पहिल्या सामन्यानंतर आता संघाने दुसऱ्या कसोटीतही एकतर्फी विजय मिळवला आहे. पाकिस्तानला दोन्ही सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सेंच्युरियनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने फलंदाजीत चांगली कामगिरी करताना 20 षटकात 206 धावा केल्या. पण गोलंदाजीत संघाला या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. दक्षिण आफ्रिकेने 19.3 धावा केल्या षटकात लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्यांची सुरुवात फारच खराब झाली. ज्यामध्ये त्यांनी 28 धावांवर रायन रिकेल्टन आणि मॅथ्यू ब्रेत्झके यांच्या विकेट्स गमावल्या. मात्र यानंतर रीझा हेंड्रिक्स आणि व्हॅन डर डुसेन यांनी आफ्रिका संघाच्या डावाची जबाबदारी तर घेतलीच पण वेगाने धावा काढण्याची प्रक्रियाही सुरू केली. तिसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये 157 धावांची मॅच-विनिंग पार्टनरशिप झाली. ज्यामुळे पाकिस्तानला मॅचमधून पूर्णपणे काढून टाकलं. दक्षिण आफ्रिकेसाठी त्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील ही चौथी सर्वात मोठी भागीदारी होती.

रीझा हेंड्रिक्सच्या बॅटमधून 63 चेंडूत 117 धावांची उत्कृष्ट खेळी पाहायला मिळाली. ज्यात त्याने 7 चौकार आणि 10 षटकारही ठोकले. यासह रिझा आता आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा संयुक्त दुसरा खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानविरुद्ध या फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो चौथा खेळाडू आहे. या सामन्यात व्हॅन डर डुसेनने 66 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजयाकडे नेले.

टी20 इंटरनॅशनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाचव्यांदा 200 पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य पार केले आहे. ज्यासह हा या फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरा संघ बनला आहे. ज्याने 200 किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य पाच किंवा अधिक वेळा पाठलाग केले आहे. या यादीत भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे. ज्याने आतापर्यंत 7 वेळा ही कामगिरी केली आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर आहे. ज्याने यापूर्वी 5 वेळा हा पराक्रम केला आहे.

हेही वाचा-

बाबर आझमने मोडला ख्रिस गेलचा मोठा विक्रम , विराट-सूर्या जवळपासही नाही
मैदानात उतरताच विराट कोहलीने पूर्ण केले ‘शतक’, अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय
IND vs AUS: गौतम गंभीरचा ‘खास खेळाडू’ टीम इंडियातून बाहेर, प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---