---Advertisement---

एकाच षटकात फुटला आफ्रिकी गोलंदाजांना घाम, पाहा मेंडिसने मारलेले तीन निर्दयी षटकार

Kusal Mendis hit three Sixes in a over
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका संघाने शनिवारी (7 ऑक्टोबर) श्रीलंकेला विजयासाठी 429 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात श्रीलंकन संघाला वेगवान सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी कुसल मेंडिस याने खांद्यावर घेतली. लुंगी एन्गिडी याने टाकेलेल्या पाचव्या षटकात मेंडिसने आफ्रिकी संघाचा अक्षरशः घाम काढला.

उभय संघांतील या सामन्यात श्रीलंकने नाणेफएक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण दक्षिण आफ्रिका संघाला लगाम घालणे श्रीलंकन गोलंदाजांना जमले नाही. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघ 50 षटकांमध्ये 5 बाद 428 धावांपर्यंत मजल मारू शकला. प्रत्युत्तरात श्रीलंकेसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कुसल मेंडिस () याने 42 चेंडूत 76 धावांचा झंझावाती खेळी केली. मेंडिसने अवघ्या 28 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. श्रीलंकेच्या डावातील पाटवे षटक लुंगी एन्गिडी याने टाकले. मेंडिसने या षटकात एक-दोन नाही तर तीन अप्रतिम षटकार मारले. हा व्हिडिओ आयसीसीच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट केले गेला आहे. या षटकातील एकही धाव फलंदाजांनी खेळपट्टीवर धावून घेतली नाही.

https://www.instagram.com/reel/CyGZPtAvL7M/?utm_source=ig_web_copy_link

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिका संघासाठी क्विंटन डी कॉक, रासी वॅन डर ड्युसेन आणि ऍडेन मार्करम यांनी वैयक्तिक शतके ठोकली. डी कॉकने 100, ड्युसेनने 108, तर मार्करमने 106 धावांची खेळी केली. (Kusal Mendis hit three incredible sixes off Lungi Ngidi’s over)

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी.

श्रीलंका – पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शानाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, कसुन राजिथा, दिलशान मदशाना, दिलशाना मदुशंका, माथेशा पाथीराना.

महत्वाच्या बातम्या – 
कुसलचा कहर! 429 धावांचा पाठलाग करताना ठोकली वर्ल्डकपमधील फास्टेस्ट फिफ्टी
विश्वचषक इतिहासातील सर्वात वेगवान पाच शतके, मार्करमसह यादीत ‘हा’ आफ्रिकी दिग्गजही सामील

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---