दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा 233 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात 24 वर्षीय मार्को जॅन्सन दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात मोठा हिरो ठरला. त्याने अशा प्रकारे गोलंदाजी केली की श्रीलंकेच्या फलंदाजांचा खेळपट्टीवर टिकाव लागला नाही. आणि त्याच्यामुळेच आफ्रिकन संघ शानदार पद्धतीने सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. मार्को जॅन्सनने या सामन्यात अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत.
दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामना डर्बनच्या किंग्समीड मैदानावर झाला. या कसोटीच्या पहिल्या डावात मार्को जॅन्सनने केवळ 13 धावा दिल्या आणि 7 विकेट्स घेतल्या. त्याच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. संघ अवघ्या 42 धावांवर गडगडला होता. यानंतर दुसऱ्या डावात त्याने चार विकेट्स घेतल्या.
अशाप्रकारे सामन्यात 11 विकेट्स घेऊन तो डर्बनच्या मैदानावर कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा संयुक्त दुसरा गोलंदाज ठरला. त्याने मुथय्या मुरलीधरनची बरोबरी केली. मुरलीधरनने 2000 मध्ये डर्बन कसोटीत 11 बळी घेतले होते. मार्को जॅन्सनने भारताच्या व्यंकटेश प्रसादचा 28 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. व्यंकटेशने 1996 मध्ये डर्बन येथे झालेल्या कसोटी सामन्यात एकूण 10 बळी घेतले होते.
डर्बन मधील कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:
क्लेरेन्स ग्रिमेट- 13 विकेट्स, 1936
मार्को जॅन्सन- 11 विकेट्स, 2024
मुथ्य्य मुरलीधरन- 11 विकेट्स, 2000
व्यंकटेश प्रसाद- 10 विकेट्स, 1996
श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत वाढ केली आहे. संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचण्याच्या त्याच्या आशा अजूनही अबाधित आहेत. आतापर्यंत एकूण 9 कसोटी सामन्यांपैकी आफ्रिकेने 5 जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. डब्ल्यूटीसी गुणतालिकेत त्यांची टक्केवारी 59.26 आहे.
हेही वाचा-
गुलाबी चेंडूच्या सामन्यात रोहित शर्माची आकडेवारी फारच खराब, दुसऱ्या कसोटीत हिटमॅनची परिक्षा!
जो रूटने मोडला सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वविक्रम, आता या बाबतीत अव्वल स्थानी
भारताला क्लीन स्वीप केलेल्या न्यूझीलंडचे दारुण पराभव, इंग्लंडने टी20 शैलीत जिंकला सामना!