भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन केल्यानंतर अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. बुमराहने दुखापतीनंतर नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून संघात पुनरागमन केले होते. परंतु या मालिकेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी त्याची चांगलीच धुलाई केली. बुमराह संघाचा दिग्गज गोलंदाज असून आगामी टी-20 विश्वचषकात देखील त्याची भूमिका महत्वाची असणार आहे. अनेकांसाठी बुमराहचा निराशाजनक प्रदर्शन चिंतेचा विषय बनले आहे. पण भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवडकर्ते राहिलेले सबा करिम यांना बुमराहच्या फॉर्मवर पूर्ण विश्वास दिसत आहे.
सबा करिम (Saba Karim) यांच्या मते जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah, ) सध्या अपेक्षित गोलंदाजी करत नसला, तरी योग्य वेळी संघासाठी फायदेशीर गोलंदाजी नक्की करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा शेवटचा टी-20 सामना हैदराबादमध्ये खेळला गेला होता. बुमराहने या सामन्यात टाकलेल्या 4 षटकांमध्ये 50 धावा दिल्या होत्या. हा त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतील सर्वात महागडा स्पेल ठरला. असे असले तरी, भारताने हा सामना जिंकून मालिका नावावर केली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका बुधवारी (28 सप्टेंबरला) सुरू झाली. ही मालिका सुरू होण्यापूर्वी करिम बोलत होते.
माध्यमांशी बोलताना सबा करिम म्हणाले की, “हे खरं आहे, पण कधी कधी आपण भारावून जातो आणि वेगवान गोलंदाजाने सर्वच टी-20 प्रकारांमध्ये चांगले प्रदर्शन करावे असे आपल्याला वाटते. पण असे होऊ शकत नाही. हा पूर्ण फॉरमॅट खूप अनिश्चिततेवर आधारित आहे. एका सामन्यात तुम्ही चांगली गोलंदाजी केली, तर दुसऱ्या सामन्यात काही फलंदाज तुमच्या मागे लागू शकतात.”
“महत्वाचे हे आहे की, गोलंदाजाला स्वतःची गुणवत्ता आणि क्षमतांवर विश्वास असला पाहिजे, जे कुणालाही बुमराहमध्ये पाहाता येऊ शकते. मी समजू शकतो तो मोठ्या काळानंतर पुनरागमन करत आहे आणि त्याला सेट होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. परंतु यामुळे आपण विचलित नाही झाले पाहिजे. बुमराह जेवढे सामने खेळेल, त्यात प्रभाव पाडेलंच असे नाही. मला विश्वास आहे, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल देखील हे दोघे भारतीय संघासाठी योग्य वेळी चांगले प्रदर्शन करतील,” अशेही करिम पुढे बोलताना म्हणाले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराट-रोहितमध्ये लागलीये महानतेची रेस! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोघांतच रंगणार ‘रनसंग्राम’
सूर्याची कमाल कायम! टी20 क्रमवारीत चढला आणखी एक पायरी; रोहित-विराटही…
‘टी-20 हा फलंदाजांचा खेळ’, भारताविरुद्धची मालिका सुरू होण्याआधी आफ्रिकी गोलंदाजांचे मोठे विधान