---Advertisement---

“मला त्या दोघांमधील टशन‌ पाहायचे आहे”, भारतीय दिग्गजाने व्यक्त केली इच्छा

On: बुधवार, फेब्रुवारी 8, 2023 4:47 PM
virat kohli vs steve smith
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेची चर्चा सध्या संपूर्ण क्रिकेटजगतात आहे. ही कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ही कसोटी मालिका बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या नावाने ओळखली जाते. या मालिकेपूर्वी वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. तसेच दिग्गज माजी क्रिकेटपटू भारतीय संघाला सल्ले देताना दिसतायेत. याच संदर्भात नुकतेच काही दिवसांपूर्वी श्रीलंकन माजी कर्णधार माहेला जयवर्धने याने ही कसोटी मालिका कोण जिंकेल याविषयी भविष्यवाणी केली होती. श्रीलंकेच्या माजी दिग्गजाने भारतीय संघाकडून अनोखी इच्छा व्यक्त केली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia Test Series 2023) यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान अनेक सर्वोत्तम खेळाडूंमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत या कसोटी मालिकेविषयी माजी क्रिकेटपटू सबा करीम (Saba Karim) यांनी भारतीय संघाकडून एक इच्छा व्यक्त केली. यात ते म्हणाले की, ‘मला या मालिकेत पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातील लढत बघायची आहे. मला कमिन्स विरुद्ध कोहली व्यतिरिक्त, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि नॅथन लायन (Nathan Lion) यांच्यातील लढत पहायची आहे. याशिवाय मला मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) विरुद्ध स्टीव्ह स्मिथ यांच्यातील लढतही पाहायला आवडेल.”

सबा करीम यांनी असे देखील म्हटले की, “या मालिकेत स्पर्धात्मक खेळपट्ट्या तयार करायला हव्या. जेणेकरून सामने चांगले होतील. भारतात फिरकीपटूंना‌ झुकते माप मिळते.‌ मात्र, त्यामुळे सामने नक्कीच एकतर्फी व्हायला नकोत.” नागपूर येथील खेळपट्टी मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना चांगली मदत मिळू शकते. त्यामुळे उभय संघ प्रत्येकी तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकतात. (saba karim want to see virat vs cummins in IND vs AUS Test series 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बापरे, एवढा विश्वास! श्रीलंकन दिग्गज म्हणतोय, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीत ‘हा’ संघ 2-1ने गुंडाळेल मालिका
विश्वचषकात पाकिस्तानला भिडण्यापूर्वी मितालीचा टीम इंडियाला सल्ला; म्हणाली, ‘वरची फळी फॉर्मात, पण…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---