अलीकडेच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज आयोजित करण्यात आली होती. ज्यात बर्याच निवृत्त माजी क्रिकेटर्सनी भाग घेतला होता. ही स्पर्धा पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडियमवर आले. स्टेडियममध्ये देश-विदेशातील या स्टार क्रिकेटरना पुन्हा एकदा खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली. ही स्पर्धा अटीतटीची राहिली. परंतु, स्पर्धेच्या समाप्तीनंतर बरेच भारतीय क्रिकेटपटू कोविड-१९ पॉझिटिव्ह आले.
कोरोनाबाधित झालेला पहिला क्रिकेटपटू होता सचिन
या स्पर्धेनंतर कोरोनाबाधित होणार पहिला क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ठरला. सर्वांसाठी हा एक मोठा धक्का होता, कारण कोविड-१९ ची नियमावली पाळून ही स्पर्धा आयोजित केली गेलेली. स्पर्धेदरम्यान, सर्व सहभागी खेळाडूंची नियमित कोरोना चाचणी होत होती. कोविड-१९ चाचणी सकारात्मक आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सचिनला रूग्णालयात दाखल केले होते.
काही दिवसांनंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी, सचिनला रुग्णालयात ऍडमिट होण्याची गरज नव्हती, असे म्हटले आहे.
सचिनला ऍडमिट होण्याची गरज नव्हती
महाराष्ट्र सरकारमध्ये वस्त्रोद्योग मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी सचिन तेंडुलकरविषयी एक विधान केले. एका वृत्तसंस्थेशी बोलताना शेख म्हणाले, “एसीम्प्टोमॅटिक सेलिब्रिटींनी घरीच उपचार करायला पाहिजे. त्यांनी रुग्णालयात बेड अडवू नयेत. अक्षय कुमार, सचिन तेंडुलकरसारख्या काही सेलिब्रिटींनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची गरज नव्हती.”
सचिननंतर तीन खेळाडू आढळले पॉझिटिव
सचिन तेंडुलकरनंतर युसुफ पठाण, एस बद्रीनाथ आणि इरफान पठाण हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. हे सर्व खेळाडू सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात इंडिया लिजेंड्स संघात होते. देशातील कोविड-१९ ची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भारतात दररोज २ लाखाहून अधिक नवीन कोविड-१९ रुग्ण सापडत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात बाधित रुग्णांनी १४ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ताकद जगासमोर! विराटची दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी विस्डेनकडून निवड; सचिन, कपिल देव यांचाही गौरव
बीसीसीआय अध्यक्षपदी कायम राहणार का सुट्टी होणार? ‘दादा’च्या भविष्याचा आज होणार निर्णय
दिल्लीच्या गोलंदाजीला येणार धार! ‘हा’ गोलंदाज आयपीएल २०२१ मध्ये पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज






