---Advertisement---

बीसीसीआय अध्यक्षपदी कायम राहणार का सुट्टी होणार? ‘दादा’च्या भविष्याचा आज होणार निर्णय

Sourav Ganguly
---Advertisement---

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीसाठी आजचा दिवस (१५ एप्रिल) खूप महत्वाचा आहे. आज यावर निर्णय घेतला जाणार आहे की, सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहे की नाही? सौरव गांगुलीसोबत जय शाह आणि जयेश जॉर्ज यांच्यावर देखील आजच निर्णय घेतला जाणार आहे. जय शाह सध्या बीसीसीआयचे सेक्रेटरी आहेत.

हा विषय सर्वोच्च न्यायालयात दीर्घ काळापासून रखडलेला आहे. आता हे तिघे आपापल्या पदावर कायम रहातील की यांना पदावरून काढून टाकण्यात येईल? यावर सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देईल. हे संपूर्ण प्रकरण कुलिंग ऑफ पिरियडशी जोडलेले आहे.

सर्वोच न्यायलयाने आखून दिलेल्या बीसीसीआयच्या संविधानानुसार, सौरव गांगुली, जय शाह आणि जयेश जॉर्ज हे तिघे ही कुलिंग ऑफ पिरियडमध्ये आहेत. यानुसार राज्य, संघ आणि बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना ३ वर्षांसाठी आपले पद सोडावे लागेल. यांचा कार्यकाळ २०२० मध्येच पूर्ण झाला आहे.

आऊटलुकच्या वृत्तानुसार, या प्रकरणाबाबत सुनावणी २३ मार्च रोजी होणार होती. परंतु सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि विनित सरन यांच्या उपस्थितीत या खटल्यावर सुनावणी करण्यात येणार आहे. या प्रकरणात बीसीसीआयची इच्छा आहे की, सौरव गांगुली, जय शाह आणि जयेश जॉर्ज यांचा कार्यकाळ कुलिंग ऑफ पिरियड शिवाय सुरू ठेवावा.

या पूर्ण प्रकरणात सौरव गांगुली यांनी आपले मत मांडत म्हटले आहे की, “सर्वोच न्यायलयाचा निर्णय आल्यानंतरच भविष्यातील गोष्टींबाबत निर्णय घेतला जाईल.”

महत्त्वाच्या बातम्या-

दोन नवे कर्णधार आज आमने सामने; ‘अशी’ असेल दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सची प्लेइंग XI

दिल्लीच्या गोलंदाजीला येणार धार! ‘हा’ गोलंदाज आयपीएल २०२१ मध्ये पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज

आश्चर्यच आहे! आयपीएल इतिहासात आरसीबीने ‘एवढ्या’ वर्षानंतर केला १५० पेक्षा कमी धावांचा बचाव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---