विश्वचषक 2023 मधील 37वा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला या सामन्यात विराट कोहलीने जबरदस्त शतक झळकावले. त्याचे वनडे करिअरमधील हे 49वे शतक होते, त्याने हे शतक ठोकत सचिन तेंडूलकरच्या 49 शतकांची बरोबरी केली आहे.
विराट कोहलीच्या या शतकानंतर वेगेवळ्या माध्यमांतून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, पण चर्चा होतेय ती सचिन तेंडुलकरने आपल्या 49व्या शतकावेळी केलेल्या वक्तव्याची. त्यावेळी सामना संपल्यानंतर सचिन बोलताना म्हणाला होता की, “मी शंभर शतकांसाठी खेळत नाही, माझी आता 99 शतकं झाली आहेत, सर्वजण म्हणतात तू शंभर शतकं करावीत पण मी माझा कधीच विचार करत नाही मी संघाचा विचार करतो. या सामन्यात चेंडू बॅटवर येत नव्हता विराटही असंच म्हणत होता. यावेळी आमच्या डोक्यात संघाची धावसंख्या 275-280 पर्यंत नेण्याचं होतं. या खेळपट्टीवर हा चांगला टोटल होता. यावेळी तो नवीन खेळाडूंबद्दल बोलताना म्हणाला, खेळाचा आनंद घ्या आणि आपली स्वप्न पूर्ण करा, मला वाटतं स्वप्न पूर्ण होतात. 22 वर्षाच्या कारकिर्दीत मी पाहिलेलं माझं स्वप्न पूर्ण झालं आहे.”
तर विराटनेही त्याच्या 49व्या शतकानंतर प्रतिक्रिया दिली आहे तो म्हणाला, “माझ्या हिरोच्या विक्रमाची बरोबरी करणे माझ्यासाठी खास आहे. फलंदाजीत तो परिपूर्ण आहे. माझ्यासाठी हा खूप भावनिक क्षण आहे. मी कुठून आलो हे मला माहीत आहे, मी त्याला टीव्हीवर पाहिलेले दिवस माहीत आहेत. फक्त त्याच्याकडून कौतुक मिळणं हे माझ्यासाठी खूप मोठं आहे.”
भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकात 5 विकेट्स गमावून 326 धावा केल्या होत्या प्रत्यत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 83 धावातच गारद झाला. या सामन्यात भारताकडून रविंद्र जडेजा याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. (Sachin old interview goes viral after Virat scores centuries He said Virat)
म्हत्वाच्या बातम्या
‘किंग’च्या बड्डेचं ‘विराट’ सेलिब्रेशन! कोहलीसोबत जडेजानेही कापला केक, व्हिडिओ जिंकतोय मने
‘…म्हणून तुमच्याकडे विराटसारखा फलंदाज हवा’, ‘किंग’ कोहलीविषयी रोहितची जबरदस्त प्रतिक्रिया