---Advertisement---

सचिन तेंडूलकरनेही केले मान्य, WTC फायनलमध्ये टीम इंडियाची ‘या’ बाबतीत झाली चूक

---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २३ जून दरम्यान पार पडला. भारत विरुद्ध न्यूझीलंड संधात झालेल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने बाजी मारली. न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला आणि विजेतेपद जिंकले. भारतीय संघाच्या झालेल्या पराभवामुळे अनेक क्रिकेट जाणकार आणि क्रिकेट रसिक नाराज झाले आहे. भारतीय संघावर नेहमी प्रमाणे लोकांचे टीकाकरणे सुरूच आहे. अशातच माजी भारतीय महान फलंदाज सचिन तेंडुलकरने सुद्धा अंतिम सामन्यात खेळवलेल्या भारतीय संघाच्या प्लेईंग ११ बद्दल आपले मत मांडले आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन सांगतो की, भारतीय संघच्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात गोलंदाजी योजनेत चूक झाली. आणि डावखुरा गोलंदाज रवींद्र जडेजाकडून कमी गोलंदाजी करण्यात आली. सचिन युट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितले की, पहिले काही दिवस उन नसल्यामुळे फिरकी गोलंदाज गोलंदाजी करताना दिसून आले नाही. खासकरून जडेजा ज्याने पहिल्या डावात केवळ ७.२ षटकं टाकली.

सचिन सांगतो की, “जेव्हा तुम्ही पाच गोलंदाज घेऊन खेळता तर, तुम्हाला त्या पाचही गोलंदाजाना समान षटकं देणे असंभव आहे. गोलंदाजी करताना तुम्हाला खेळपट्टीची परिस्थिती, वातावरण,आणि हवेची मिळणारी साथ या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो.

सचिनने सांगितले की, “रवीचंद्रन अश्विनला जडेजाहून अधिक गोलंदाजी करण्याचे कारण समजले की, न्यूझीलंड संघाचे डावखुरे फलंदाज क्रीजवर आपले पाय जमवून बसले होते. न्यूझीलंड संघाकडे डावखुरे फलंदाज होते. ज्यामुळे जडेजा कमनशिबी ठरला. साउथॅम्प्टनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजाना अनुकूल होती फिरकी गोलंदाजांना नाही.”

अंतिम सामन्यात भारतीय संघाने दोन फिरकी गोलंदाज आणि तीन वेगवान गोलंदाज अंतिम ११ जणांच्या संघात खेळवले होते. तसेच न्यूझीलंडने मात्र, एकाही फिरकी गोलंदाजाला अंतिम ११ जणांच्या संघात स्थान न देता ५ वेगवान गोलंदाज खेळवले होते. साउथॅम्पटनमधील ढगाळ वातावरणाचा वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा झाला.

महत्त्वाच्या बातम्या – 

नवीन संघ, नवीन कर्णधार आणि नवीन खेळाडू! ‘या’ कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरेल श्रीलंका दौरा

भारतीय संघातील ‘या’ खेळाडूच्या जीवावर युवराज सिंग आपल्या प्राणाची बाजी लावण्यास तयार

WTC Final: रिषभ पंतच्या ‘त्या’ बेजबाबदार फटक्यावर दिग्गज खेळाडूने दिली प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---